Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Online Taxi Service: खासगी वाहनांना व्यावसायिक व्यापार करता येणार नाही

Online Taxi Service

खासगी वाहनांना व्यावसायिक वापर करता नाही असा अध्यादेश महाराष्ट्र सरकारने काढला आहे. Rapido या मोबाईल ऍप आधारित वाहतूक सेवेच्या बंदीनंतर हा निर्णय घेतला गेला आहे.

गेल्या आठवड्यात रॅपिडो (Rapido) कंपनीला तात्काळ स्वरूपात सेवा बंद करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला होता. व्यावसायिक वाहतुकीचा परवाना नसताना देखील रॅपिडो कंपनी ऍपच्या मदतीने ग्राहकांना वाहतुकीची सेवा पुरवत होती. राज्य सरकारने देखील याबाबत अधिसूचना जारी केली असून परवाना नसताना दुचाकी (Two Wheeler), तीनचाकी (Three Wheeler) आणि चारचाकी (Four Wheeler) खासगी वाहन चालवता येणार नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले आहे.

परिवहन विभागाकडे (RTO) वाहतुकीच्या साधनांची नोंद असणे कायद्याने गरजेचे आणि आवश्यक आहे. परंतु राज्यात अनेक ठिकाणी विना परवाना दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांचा उपयोग करून अवैधरित्या प्रवासी वाहतूक केली जात आहे. मुख्यत्वे ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होताना दिसते. या वाहनांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही उपाययोजना नसतात, त्यामुळे आणीबाणीच्या काळात प्रवाशांच्या जीवाला धोका पोहचू शकतो. 

या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर खासगी दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांचा व्यावसायिक वापर करता येणार नाही हे शासनाने स्पष्ट केले आहे. 
परिवनानाची परवानगी नसलेल्या वाहनांना परवाना दिला जावा किंवा नाही, त्याच्या अटी आणि नियमावली काय असतील यावर सरकारने एक समिती नेमली आहे. या समितीने दिलेल्या शिफारशीनुसार सरकार पुढील कारवाई करणार आहे. तसेच राज्यात प्रवाशांची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी परिवहनेतर वाहनांचा ऍप आधारित वापर करण्यावर सरकारने प्रतिबंध घातला आहे.