PM SVANidhi Scheme: पंतप्रधान स्वनिधी योजनेसाठी )PM SVANidhi Scheme) गॅरंटी म्हणून कोणताही कागद किंवा डॉक्युमेंट सबमिट करण्याची गरज नाही. कारण या योजनेची गॅरंटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली असून, ते या योजनेचे गॅरेंटर आहेत, असे उद्गार अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी एका कार्यक्रमात काढले.
पंतप्रधान स्वनिधी योजनेंतर्गत आतापर्यंत 2,300 हून अधिक फेरीवाल्यांना कर्ज मिळाले आहे. या योजनेंतर्गत अनुदान मिळवण्यासाठी पुरावा म्हणून कोणतेही कागदपत्रे जमा करावे लागत नाही. कारण या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे स्वत: गॅरंटर आहेत, असे वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी काढले. राजस्थानमधील कोटा येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी 33 हजारांहून अधिक लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या विविध योजनांतर्गत कर्ज वाटपाचे प्रमाणपत्र देण्यात आले.
पीएम स्वनिधी ही केंद्र सरकारची योजना आहे. रस्त्यावरील फेरीवाल्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने 2020 मध्ये ही योजना सुरू केली. त्यावेळी कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यावेळी फेरीवाल्यांचे बरेच हाल झाले. त्यांच्याकडे नव्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल नव्हते. त्यावेळी सरकराने खास फेरीवाल्यांसाठी स्वनिधी योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत फेरीवाल्यांना 10 हजारांपर्यंत किमान व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
पीएम स्वनिधी योजना काय आहे?
पीएम स्वनिधी योजने अंतर्गत (PM SVANidhi Scheme) फेरीवाल्यांना कोणतीही हमी न देता दहा हजार रुपयांचे कर्ज घेता येते. केंद्र सरकारने आत्मनिर्भर निधी योजने अंतर्गत खासकरून फेरीवाल्यांसाठी ही योजना सुरू केली. सरकार या कर्जावर माफक व्याजदर आकारते. कोरोनानंतर अनेक फेरीवाल्यांकडे नव्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल नव्हते. त्यांना पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारने स्वनिधी योजना सुरू केली.
स्वनिधी योजने अंतर्गत किती कर्ज मिळते?
स्वनिधी योजने अंतर्गत अर्जदाराला सुरूवातीला कोणत्याही हमीविना 10 हजारांचे कर्ज मिळते. अर्जदाराने किंवा फेरीवाल्याने हे कर्ज जर दिलेल्या मुदतीत फेडले तर त्याला 20 हजारांचे कर्ज दिले जाते. असेच फेरीवाल्यांना कोणत्याही हमीविना 50 हजारांपर्यंत कर्ज देण्याची सोय या योजनेमध्ये आहे.
स्वनिधी योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
स्वनिधी योजनेसाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन असा दोन्हीप्रकारे अर्ज करता येतो. ऑफलाईन प्रक्रियेमध्ये बॅंकेद्वारे हा अर्ज भरता येतो. यासाठी बॅंकेकडून अर्ज घेऊन तो विविध कागदपत्रे जोडून पुन्हा बॅंकेकडे जमा करणे गरजेचे आहे. बॅंक सर्व कागदपत्रांची खातरजमा करून अर्ज मान्य करते. तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://pmsvanidhi.mohua.gov.in/ या वेबपोर्टलद्वारे अर्ज करता येतो.