शेतकऱ्यांना पिकांची पेरणी केल्यापासून ती काढेपर्यंत अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते. अशा नैसर्गिक संकटातून शेतकऱ्याला दिलासा मिळावा म्हणून पंतप्रधान पिक विमा योजना लागू केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना कमीतकमी प्रिमियम भरून आपल्या पिकांची नुकसान भरपाई मिळणार आहे.
या योजनेत गारपीट, वादळ, अतिपाऊस या नैसर्गिक आपत्तींसह जनावरांच्या हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीचीही भरपाई मिळणार आहे. या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो. ही योजना कोणत्या पिकांसाठी लागू आहे. तसेच यासाठी प्रीमियम किती भरावा लागतो. याची माहिती आपण घेणार आहोत.
योजनेचा लाभ कोणाला?
देशातील कोणत्याही, राज्यातील प्रदेशातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. तसेच जे शेतकरी तृणधान्ये, बाजरी, कडधान्ये, तेलबिया, तसेच नगदी पिके घेतात. ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
इतका भरावा लागतो प्रीमियम
खरीप हंगामातील पीके, तेलबिया पिकांसाठी जास्तीत जास्त 2% रक्कम.
रब्बी हंगामातील तेलबिया पिकांसाठी केवळ 1.5 टक्के रक्कम भरावी लागते.
बागायती पिकांना एकूण प्रीमियमच्या जास्तीत जास्त 5 टक्के रक्कम भरावी लागते.
नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जासोबत 7/12, पिकाची नोंद असलेल्या विमा हप्ता भरल्याचा पुरावा आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
शेतकरी योग्य माहितीसह अर्ज सादर करु न शकल्यास उपलब्ध माहितीच्या आधारे अर्ज सादर करु शकतो. पण अर्जात नमूद नसलेली उर्वरित माहिती सात दिवसाच्या आत विमा कंपनीस सादर करावी लागते.
पिकांचे नुकसान झाल्याचा पुरावा म्हणून छायाचित्रे देता येतील.
वेबसाईटवरून विम्याची स्थिती तपासा
केंद्रीय कृषि मंत्रालयातर्फे राबवण्यात येणाऱ्या पंतप्रधान पिक विमा योजनेबाबतची सर्व माहिती पंतप्रधान पीक विमा योजना या संकेतस्थळावर मराठीतून देण्यात आली आहे. इथे तुम्ही लॉगिन करून अर्ज करू शकता. तसेच अर्जाची किंवा पॉलिसीची सद्यस्थिती तपासू शकता. तसेच तुम्हाला जर तुमच्या पिकांसाठी नेमका किती प्रीमियम भरावा लागू शकतो. हे पाहण्याची सोय सुद्धा इथे देण्यात आली आहे. होमपेजवरील विमा प्रीमियम कॅल्क्युलेटर यावर क्लिक करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे भरून तुमच्या पिकांसाठी नेमका किती प्रीमियम भरावा लागेल, याची माहिती घेऊ शकता.