चीन आणि आणखी काही देशात कोरोनाने थैमान घालायला पुन्हा सुरुवात केली आहे. यामुळे भारताला सतर्क राहण्याची गरज तीव्रतेने पुढे आली आहे. यातून आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. ज्या ठिकाणी गर्दी असेल त्याठिकाणी मास्क (मुखपट्टी) वापर, लसीकरण पूर्ण करणे तसेच अन्य उपाययोजना करण्याचा सल्ला केंद्र सरकारने राज्यांना दिला आहे. यामुळे आता मास्कच्या किमती (Mask Price) वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अचानक मागणी वाढली तर होते किमतीत वाढ
मागणीत अचानक वाढ होते तेव्हा किमतीत वाढ होते. मास्क किमतीच्या (Mask Price) बाबतीत 2020 मध्ये आपण हा अनुभव घेतला आहे. जानेवारी 2020 पासून कोविड 19 ची चर्चा सुरू झाली. चीनमधून रुग्णवाढीच्या बातम्या येऊ लागल्या. कालांतराने भारतातही किरकोळ स्वरूपात कोविडयूक्त रुग्ण सापडत गेले. नंतर नंतर तर याचा उद्रेक वाढत गेला. संसर्गाने हा विषाणू वाढतो यामुळे मास्कचे महत्व सगळ्यांना जाणवू लागले. यातून अचानक मास्कला मागणी वाढली. यातून सुरुवातीच्या टप्प्यात मास्कच्या किमतीही वाढल्याचे दिसून आले होते.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी बुधवारी बैठक घेतली. यावेळी तज्ञासह, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जागतिक पातळीवर होणाऱ्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या स्थितीबाबत यावेळी चर्चा झाली. कोरोनाची साथ अजून संपलेली नाही, यामुळे प्रतिबंधक उपाययोजनांची आवश्यकता अधोरेखील करण्यात आली. लसीकरण पूर्ण करण्याचेही स्पष्ट करण्यात आले. त्याचबरोबर जिथे गर्दी असेल तिथे मास्क लावण्याची गरजही निर्माण झाली. राज्यांना या प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मास्क न लावल्याने रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ
2020 मध्ये जेव्हा कोविड 19 ची सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीला रुग्णसंख्या तुरळक होती. मास्कचा वापरही नीट होत नसल्याचे आढळून आले होते. यातून पोलिसांनी रस्त्यावर उभे राहून मास्क न लावल्यास दंड ठोठावल्याच्याही घटना घडत होत्या. मात्र, कालांतराने संसर्ग होत गेला. रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली तसतसे मास्कचे महत्व अधोरेखित होत गेले. यानंतर 10 रुपयातही मास्क उपलब्ध होऊ लागला होता. सुरुवातीला मात्र तो मिळणेही कठीण झाले होते. मिळाल्यास किमती जास्त असल्याचे अनेकदा आढळून आले होते.
मास्कमुळे कोविडच्या विषाणूला कितपत प्रतिबंध बसतो, याविषयी वेळोवेळी प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मात्र शासन पातळीवर हा एक महत्वाचा प्रतिबंधात्मक उपाय मानला जात असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. आता केंद्रीय मंत्र्यांच्या भूमिकेतूनही ते स्पष्ट झालय. राज्यांना या सूचना मिळाल्या आहेत. यामुळे भविष्यात मास्क सक्तीचा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास मास्कच्या किमतीबाबतही नागरिकांना जागरूक राहावे लागणार आहे.