• 04 Oct, 2023 13:13

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पोस्ट खात्याची बॅंकिंग सेवा लवकरच व्हॉट्सॲपवर!

POST OFFICE WHATSAPP ONLINE

IPPB आणि व्हॉट्सॲप यांच्या माध्यमातून नवीन खाते उघडणे, शिल्लक तपासणे सहज शक्य होणार

केंद्र सरकार इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप (WhatsApp) यांच्यात बँकिंग आणि वित्तीय सेवा देण्यासाठी टाय-अप (हातमिळवणी) करण्याचा विचार करत आहे. डिजिटल युगासोबत राहण्याच्या प्रयत्नात आणखी चांगल्या सेवा देण्यासाठी सरकार इंडिया पोस्ट आणि व्हॉट्सॲप यांच्यातील सहकार्याचा विचार करत आहे. आयपीपीबीच्या (IPPB) ग्राहकांना व्हॉट्सॲप (WhatsApp) च्या माध्यमातून खात्याची शिल्लक तपासणे, नवीन खाते सुरु करणे यासारख्या सेवा तात्काळ मिळाव्या यासाठी हे टाय-अप महत्वाची भूमिका बजावणार आहे. 

आयपीपीबी म्हणजे काय 

बदलत्या काळानुसार बँकिंग व्यवहारामध्ये मोठे बदल होत आहेत. जवळपास सर्वच बँकेचे व्यवहार ऑनलाइन झाले आहेत. पोस्ट खात्याने देखील आपल्या सेवा ऑनलाइन केल्या आहेत. पोस्ट खात्याने इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे (IPPB) ॲपची सुरुवात केली आहे. 2018 मध्ये सुरू केलेली, आयपीपीबी (IPPB) ही एक पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. यात केंद्र सरकारची 100 टक्के भागीदारी आहे. पोस्ट विभागाच्या अंतर्गत पेमेंट बँक म्हणून त्याची स्थापना करण्यात आली आहे. या मोबाइल ॲपच्या माध्यमातून सहजपणे डिजीटल बचत खाते आणि ऑनलाइन व्यवहार देखील करता येऊ शकतात.

आयपीपीबी-व्हॉट्सॲपद्वारे दिल्या जाणार्‍या सेवा

इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आयपीपीबी (IPPB) आणि व्हॉट्सॲप (WhatsApp) यांच्यातील सुरुवातीच्या टाय-अप मुळे ग्राहकांना खात्यातील शिल्लक तपासणे आणि नवीन बँक खाते उघडण्याची विनंती करण्याचा पर्याय दिला जाणार आहे. तसेच पुढील 60 दिवसात आयपीपीबीच्या (IPPB) सेवांसह एक पायलट प्रोजेक्ट चालवला जाईल जसे की बॅलन्सची चौकशी, नवीन खात्यासाठी विनंती, पिन बदलणे आणि पासवर्ड तपासणे शक्य होणार आहे. तसेच काही निवडक ग्राहकांना रोख पैसे काढणे आणि जमा करण्याची विनंती, आधार-टू-आधार हस्तांतरण, कायम खाते क्रमांक (पॅन) आणि आधार क्रमांक अद्यन्वित करणे या सारख्या सेवा दिल्या जाणार आहेत. 

या सेवा देण्याचा विचार

अहवालात असेही म्हटले आहे की भविष्यात, सरकार आयपीपीबी (IPPB) व्हॉट्सॲप सोबत टाय-अप झाल्यास, व्हॉट्सॲपद्वारे कुरिअर पॅकेज बुक करणे, पगार, बचत आणि चालू खाती उघडणे तसेच पगाराचे वितरण करणे यासारख्या सेवा देण्याचा विचार करण्यात येणार आहे. तसेच या उपक्रमाला प्रतिसाद मिळाल्यास  सरकार PPF पेमेंट तसेच व्हॉट्सॲप (WhatsApp) द्वारे विमा खरेदी करणे यासारख्या इतर वित्तीय सेवा देखील देण्याचा विचार करणार आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप (WhatsApp) यांच्यातील टाय-अपने पोस्टाच्या ग्राहकांचा वेळ वाचणार आहे. त्यामुळे हा व्यवहार ग्राहकांसाठी फायदेशीर ठरू शकतो.