Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PM Kisan : पीएम किसानचा 13वा हप्ता रिलीज झाला

PM Kisan Samman Nidhi

शेतकऱ्यांना प्रतिक्षा असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) 13 वा हप्ता रिलीज करण्यात आला आहे. कर्नाटकातील बेळगावी येथे आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 16,800 कोटी रुपये ट्रान्सफर केले.

शेतकऱ्यांना प्रतिक्षा असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) 13 वा हप्ता रिलीज करण्यात आला आहे. कर्नाटकातील बेळगावी येथे आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 16,800 कोटी रुपये ट्रान्सफर केले. त्यामुळे या हप्त्याचा थेट लाभ 8 कोटी 2 लाख शेतकऱ्यांना मिळाला आहे. या सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित होते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना एका वर्षात 6 हजार रुपये मिळतात. वर्षभरात तीन हप्त्यांद्वारे प्रत्येकी 2 हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जातात. ऑक्टोबर 2022 मध्ये पीएम किसानचा 12 वा हप्ता तर, 11 वा हप्ता मे 2022 मध्ये रिलीज करण्यात आला होता.     

8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 12 वा हप्ता मिळाला     

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये शिमला, हिमाचल येथे आयोजित कार्यक्रमात पीएम किसानचा 12 वा हप्ता जारी केला. 12 वा हप्त्याचा लाभ देशातील आठ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळाला. तर 11 वा हप्ता 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळाला. अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी न करणे आणि सरकारने केलेल्या तपासणीत बनावट लाभार्थी आढळून आल्याने योजनेचा 12 वा हप्ता कमी मिळाला.     

याप्रमाणे लाभार्थ्यांची यादी पहा     

 • पात्र शेतकऱ्यांच्या यादीत (PM Kisan Beneficiary List) शेतकरी त्यांचे नाव ऑनलाइन तपासू शकतात. यासाठी त्यांना कुठेही जाण्याची गरज नाही. असे तपासा नाव.     
 • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.     
 • farmer corner वर क्लिक करा.     
 • नवीन पेज उघडेल.     
 • येथे beneficiary list पर्याय निवडा.     
 • एक फॉर्म उघडेल. यामध्ये प्रथम राज्य, नंतर जिल्ह्याचे नाव, ब्लॉक आणि गाव निवडा.     
 • सर्व माहिती भरुन पूर्ण झाल्यानंतर get report वर क्लिक करा.     
 • असे केल्याने तुमच्या गावातील पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी तुमच्यासमोर उघडेल.     

पीएम किसान सन्मान निधी योजनेचे फायदे     

 • या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 6 हजार रुपये जमा होतात.      
 • कुटुंबातील एक शेतकरीच या योजनेचा लाभार्थी ठरतो.      
 • पश्चिम बंगाल सोडून देशातील इतर राज्यातील शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात.      
 • या योजनेंतर्गत मिळालेल्या मदतीमुळे शेतकरी त्यांच्या आर्थिक गरजा देखील पूर्ण करू शकतात.      
 • शेतीमध्ये सुधारणा हे पंतप्रधान किसान योजनेचे उद्दिष्ट आहे.     
 • ही योजनेचा लाभ जमीनधारक शेतकरी कुटुंबातील पती, पत्नी आणि अल्पवयीन मुलांपैकी कोणीही मिळवू शकतो.     
 • शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारून त्यांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणे हा या योजनेमागील सरकारचा उद्देश आहे.     
 • ही योजना सुरू झाल्यापासून या योजनेत अनेक अपडेट करण्यात आले.            

News Source : PM releases Rs 16,000 cr to farmers in latest installment under PM-KISAN | Business Standard News (business-standard.com)      

Pm modi kisan samman nidhi yojana 13th instalment release rs 2000 transferred to farmers bank account check beneficiary list - PM Kisan: अभी-अभी जारी हुई 13वीं किस्त, PM मोदी ने दबाया बटन, फटाफट चेक करें पैसा आया कि नहीं – News18 हिंदी      

PM Kisan Yojana:पीएम किसान योजनेची रक्कम वाढवली जाणार नाही,कृषिमंत्र्यांचे स्पष्टीकरण (mahamoney.com)