Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Retirement Planning: निवृत्तीनंतरचं प्लॅनिंग करत आहात? जाणून घ्या एसआयपी आणि एसडब्लूपीबद्दल...

Retirement Planning: निवृत्तीनंतरचं प्लॅनिंग करत आहात? जाणून घ्या एसआयपी आणि एसडब्लूपीबद्दल...

Retirement Planning: वाढती महागाई आणि राहणीमानाचा खर्च हा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर चालला आहे. त्यामुळे अनेकजण निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनाला प्राधान्य देत नाहीत किंवा ती त्यांची प्राथमिकता नसते. गुंतवणूक करण्याचं ठरवलं तरी मध्येच काही अडचणी येतात आणि नियोजन बारगळतं.

निवृत्तीनंतरचं (Retirement) आर्थिक गणित बसवण्यासाठी अनेकजण दीर्घकालीन नियोजन करतात. मात्र मधल्या काळात आपल्या लक्ष्यापासून विचलित होतात. त्यामुळे वेळेवर निश्चित केलेलं लक्ष्य साध्य करणं अवघड होऊन बसतं. नोकरी करत असताना आर्थिकदृष्ट्या अडचणी कमी असतात. मात्र निवृत्तीनंतरचं आयुष्य काहीसं आव्हानात्मक होतं. म्हणूनच वेळेला प्राधान्य देऊन त्याचं योग्य नियोजन (Planning) करणं गरजेचं आहे. सध्या आरोग्य सुविधा वाढल्या आहेत. त्यामुळे देशातलं सरासरी वयदेखील वाढलं आहे. साधारणपणे निवृत्तीनंतरचं आयुष्य 30 वर्षे किंवा त्याहून अधिक असू शकतं.

ध्येयापासून दूर

सध्या तुम्ही नोकरी करत आहात पण तुम्ही लवकर निवृत्ती घेण्याचं ठरवलं असेल आहे आणि त्यानंतर तुम्हाला विश्वभ्रमंती करायचा आहे. यासाठी तुम्ही साधारणपणे 20 किंवा 30 वर्षांचं टार्गेट ठेवून आर्थिक नियोजन सुरू करता. मात्र मध्येच काही गोष्टी अशा घडतात त्यामुळे तुम्ही ठरवलेल्या बाबी पूर्ण होत नाहीत. या परिस्थितीत 20 किंवा 30 वर्षे काहीही असो, तोपर्यंत तुम्ही निवृत्त होण्यासाठी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे तयार नसता. याचा परिणाम असा, की तुम्ही ठरवलेल्या वेळी निवृत्त होऊ शकत नाहीत, ती कालमर्यादा वाढतच जाते.

निवृत्तीनंतरची आव्हानं

आव्हानं ही काही केवळ कामाच्या वर्षांमध्ये कमाई करण्याच्या संदर्भातली नसतात. तर ती ज्या काळात आपण काम करत नाही त्या दीर्घ कालावधीतल्या गरजा पूर्तता करण्याचीदेखील असतात. सध्याच्या घडीला आरोग्य सेवा सुधारल्या आहेत. त्यामुळे देशातलं सरासरी जीवनमानही वाढलं आहे. अशावेळी नॉन-वर्किंग म्हणजेच निवृत्तीनंतरचं आयुष्य 30 वर्षे किंवा त्याहून अधिक असू शकतं. निवृत्तीनंतरच्या वर्षांतल्या आपल्या गरजा पूर्ण करायच्या असतील, तर लवकरात लवकर योग्य प्रकारे गुंतवणूक करण्याची जबाबदारीही आपल्यावरच असते.

नियोजन करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

आरोग्यसेवा, सांभाळ करणारे, मुलांचं शिक्षण, मुलांचं लग्न आणि वृद्ध व्यक्तीच्या जीवनशैलीच्या गरजा यावरच्या खर्चाबरोबरच महागाईमुळे राहणीमानाचा वाढता खर्च तुम्हाला विचारात घ्यावा लागणार आहे. बदलत्या वातावरणात आता तुम्ही तुमच्या मुलांवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहू शकत नाहीत. तुम्ही निवृत्त होत असताना ते तुमच्याजवळ असतीलच असं नाही. त्यांच्या करिअरसाठी ते दुसऱ्या शहरात किंवा दुसऱ्या देशात राहत असतील.

एसआयपी आणि एसडब्लूपी

निवृत्तीचं नियोजन करताना दोन बाबी आहेत. फंड सतत वाढवणं आणि फंडाचा आकार कमी करणं. निधी उभारणीचा टप्पा एसआयपीद्वारे केला होऊ शकतो. ही एक सर्वोत्तम आणि लोकप्रिय पद्धत आहे. चक्रवाढीच्या ताकदीचा फायदा घेण्यासाठी या टप्प्यात तुमच्या गुंतवणुकीचा मोठा भाग हा इक्विटीमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला जातो. एसआयपी हा एक चांगला पर्याय याकरता असतो, की या माध्यमातून नियमितपणे गुंतवलेल्या थोड्या रकमेमध्ये तुम्ही निवृत्त होईपर्यंत मोठा निधी उभारण्यात आलेला असतो.

शिस्तबद्ध पद्धतीनं पैसे काढण्याची पद्धत

दुसरा टप्पा म्हणजे निवृत्तीनंतर तुमचा मासिक खर्च भागवण्यासाठी तुमच्या गुंतवणुकीतला पैसा कसा वापरायचा? यासाठी सिस्टिमॅटिक विथड्रॉल प्लॅन म्हणजेच एसडब्लूपी मदत करू शकते. एसडब्लूपीचा मुख्य फायदादेखील एसआयपीसारखाच आहे. जसं एसआयपीमध्ये शिस्तबद्ध पद्धतीनं गुंतवणूक केली जाते, त्याचप्रमाणे एसडब्लूपीमध्ये शिस्तबद्ध पद्धतीनं पैसे काढले जातात.

पद्धतशीर पैसे काढण्याची योजना काय आहे

एसडब्लूपी किंवा पद्धतशीर पैसे काढण्याची योजना ही तुमच्या गुंतवणुकीतून पैसे काढण्याचा एक शिस्तबद्ध पर्याय आहे. हा पर्याय सेवानिवृत्तीसाठी किंवा नोकरी सोडताना चांगलं काम करतो. यासाठी तुम्हाला तुमच्या म्युच्युअल फंडाला महिन्याच्या एका विशिष्ट तारखेला विशिष्ट रक्कम डेबिट करण्याची सूचना द्यावी लागते. त्यानंतर पैसे तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जातील. पैसे काढल्यानंतर उरलेले पैसे सुरक्षित राहतात त्यावर तुम्हाला त्यावर परतावादेखील मिळत राहतो. या माध्यमातून चक्रवाढीचा लाभ मिळत राहतो.