Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Phone Pe Stock.Market App: फोन पेकडून नवे अ‍ॅप लाँच; स्टॉक ट्रेडिंग, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येणार

Stock.Market App

Image Source : www.dtnext.in/www.news9live.com

फोन पे ने स्टॉक ब्रोकिंग व्यवसायात उडी घेतली असून Stock.Market App आज (बुधवार) लाँच केले. याद्वारे शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, इटीएफमध्ये गुंतवणूक करता येईल. ग्राहकांना डिमॅट खाते सुरू करून सर्व सुविधांचा लाभ घेता येईल.

Phone Pe Stock.Market App: डिजिटल पेमेंट क्षेत्रातील आघाडीची कंपनी फोन पे ने स्टॉक ब्रोकिंग व्यवसायात उडी घेतली असून Share.Market हे अ‍ॅप लाँच केले आहे. भारतात शेअर मार्केट, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी कंपनीने नव्या व्यवसायात पदार्पण केले.

2021 सालापासून फोन पे चे स्टॉक ब्रोकिंग व्यवसायात पदार्पण करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, सेबीकडून परवाना मिळाला नव्हता. वॉलमार्ट या बलाढ्य इ-कॉमर्स कंपनीची फोन पे मध्ये गुंतवणूक आहे. या अ‍ॅपद्वारे ग्राहकांना स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, इटीएफमध्ये गुंतवणूक करता येईल. 

फोन पे कडे 40 कोटी ग्राहक 

 Stock.Market अ‍ॅपवर सुरुवातीचे काही दिवस ब्रोकरेजवर डिस्काउंट देण्यात येत आहे. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर आणि iOS वर मिळेल. फोन पे कडे सुमारे 40 कोटी ग्राहक आहेत. या ग्राहकांना आपल्या नव्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी कंपनी प्रयत्नशील राहील. झिरोधा, ग्रो, एंजल वन, IIFL, मोतीलाल ओसवाल सह इतर ब्रोकरेज कंपन्यांशी फोन पे ची स्पर्धा राहील. 

Share.Market द्वारे कोणत्या सुविधा मिळतील?

डिमॅट खाते सुरू करता येईल.

कंपन्यांचे शेअर्स, इटीएफ, थीम बेस्ड स्टॉक्समध्ये गुंतवणूक करता येईल. 

शेअर मार्केट, इंडेक्सचे विश्लेषण पाहता येईल. 

विविध ट्रेडिंग टूल्स वापरता येतील. 

विविध म्युच्युअल फंड स्कीममध्ये गुंतवणूक करता येईल. 

"मागील काही दिवसांपासून आम्ही कर्ज, विमा आणि पेमेंट गेट वे क्षेत्रात पदार्पण केले. म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युशनचा व्यवसाय आम्ही 4 वर्षांपूर्वी सुरू केला. आता फोन पे वेल्थ या कंपनीद्वारे आम्ही स्टॉक ब्रोकिंग व्यवसायात उडी घेत आहोत, असे फोन पे चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी समीर निगम यांनी म्हटले. 

2022 फोन पे ने वेल्थ डेस्क आणि ओपन क्यू हे दोन व्यवसाय ताब्यात घेतले. या दोन्ही व्यवहारांचे मूल्य 70 मिलियन डॉलर इतके होते. फक्त पेमेंट व्यवसायात न राहता इतर आर्थिक सेवाही ग्राहकांनाही पुरवता यावा यासाठी फोन पे ने या कंपन्या विकत घेतल्या.