Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Indus App Store :’ फोनपे’ने लॉन्च केले इंडस ॲप स्टोअर, Google Play Store ला देणार टक्कर

Phonepe

भारतीयांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन फोनपे ने हे ॲप स्टोअर डिझाईन केले आहे. पूर्णतः भारतीय बनावटीचे हे ॲप स्टोअर असून युजर्सला 12 प्रकारच्या भारतीय भाषांचा अनुभव येथे घेता येणार आहे. भारतीय बनावटीच्या वेगवेगळ्या मोबाईल ॲप्सला लिस्टिंग करण्यात इथे मदत केली जाणार आहे.

PhonePe ही डिजिटल पेमेंटसाठी प्रसिद्ध असलेल्या कंपनीने आता ॲप डेव्हलपिंगच्या क्षेत्रात उडी घेतली आहे. गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) आणि ॲपल ॲप स्टोअर (Apple App Store) च्या मक्तेदारीला सुरुंग लावण्याची फोनपेची योजना आहे.

कंपन्यांच्या या स्पर्धेचा फायदा मात्र सामान्य मोबाईल युजर्सला होणार आहे. ते कसे हे या बातमीत जाणून घ्या. PhonePe ने Indus AppStore डेव्हलपर प्लॅटफॉर्म लॉन्च करण्याची घोषणा केली असून सर्व अँड्रॉइड ॲप डेव्हलपरना प्लॅटफॉर्मवर त्यांचे ॲप्लिकेशन Indus AppStore वर सूचीबद्ध करण्यासाठी आमंत्रित केले आहे.

‘मेड इन इंडिया’चा जलवा!

भारतीयांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन फोनपे ने हे ॲप स्टोअर डिझाईन केले आहे. पूर्णतः भारतीय बनावटीचे हे ॲप स्टोअर असून युजर्सला 12 प्रकारच्या भारतीय भाषांचा अनुभव येथे घेता येणार आहे. भारतीय बनावटीच्या वेगवेगळ्या मोबाईल ॲप्सला लिस्टिंग करण्यात इथे मदत केली जाणार आहे.

याआधी गुगल आणि ॲपल केवळ त्यांच्याच मोबाईल ॲप्सला प्रमोट करतात अशी तक्रार केली जात होती. नवख्या, युवा तंत्रज्ञ मंडळींनी बनवलेले ॲप्स युजर्सपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक अडचणींचा समाना करावा लागत होता. आता मात्र Indus AppStore वर सर्व युवा ॲप डेव्हलपर्सला संधी मिळेल असे कंपनीचे म्हणणे आहे.  

पहिल्या वर्षी निशुल्क सेवा 

कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार ॲप डेव्हलपर्सला त्यांचे ॲप्स पुढील एक वर्षाकरिता मोफत Indus AppStore वर टाकता येणार आहे. एक वर्षानंतर ॲप डेव्हलपर्सकडून नाममात्र परिचालन शुल्क घेतले जाईल असे देखील फोनपेने म्हटले आहे. ॲप डेव्हलपर्सकडून कुठल्याही प्रकारचे कमिशन देखील घेतले जाणार नाही असे देखील कंपनीने म्हटले आहे.