Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PharmEasy: फार्मइझी कंपनी आर्थिक अडचणीत; शेअरवर 90% सूट देऊन आणखी पैसे उभारणार

Startup Funding

Image Source : www.inc42.com

ऑनलाइन औषध विक्री करणारी फार्मइझी कंपनी आर्थिक चणचणीचा सामना करत आहे. कंपनीला व्यवसाय चालवण्यासाठी तसेच कर्जदारांचे पैसे देण्याची अत्यंत निकड आहे. त्यामुळे कंपनी राइट इश्यू मार्फत पैसे उभे करण्याचे नियोजन आखत आहे.

PharmEasy money crisis: ऑनलाइन औषध विक्री व्यवसायातील फार्मइझी कंपनी आर्थिक चणचणीचा सामना करत आहे. कंपनीला व्यवसाय चालवण्यासाठी तसेच कर्जदारांचे पैसे देण्यासाठी निधीची अत्यंत निकड आहे. त्यामुळे कंपनी राइट इश्यू (Rights Issue) मार्फत पैसे उभारण्याचे नियोजन आखले आहे. समभागधारकांना शेअरवर 90% सूट देऊन 2,400 कोटी रुपये उभारण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. यासाठी नवे शेअर्स इश्यू केले जातील. 

थकीत कर्ज फेडण्याचा प्रयत्न

गोल्डमॅन सॅच या गुंतवणूक संस्थेचे कर्ज परत करण्यासाठी फार्मइझीला पैशांची गरज असल्याचे समोर येत आहे. इकॉनॉमिक टाइम्सने यांसंबंधीत वृत्त दिलं आहे. राइट इश्यूमुळे गुंतवणुकदारांना अतिरिक्त शेअर्स स्वस्तात घेण्याची संधी मिळाली आहे.

5 रुपये प्रति शेअर किंमत

फार्मइझी ही API होल्डिंग्ज कंपनीच्या अंतर्गत येते. राइट इश्यूद्वारे 5 रुपये प्रति शेअर्स इश्यू केले जातील. याआधी API holding या कंपनीने 50 रुपये प्रति शेअर्सने बाजारातून पैसे उभे केले होते. फार्मइझी ही ऑनलाइन औषधांचा थेट ग्राहकांना पुरवठा करते. तसेच थायरोकेअर डायग्नॉस्टिक लॅब व्यवसायही API होल्डिंग्ज कंपनीच्या ताब्यात आहे. या व्यवसायाचे एकूण मूल्य 560 कोटी डॉलर्स इतके आहे.

फार्मइझी कंपनीच्या 500 ते 600 मिलियन डॉलरच्या मुल्यांकनावर नवीन पैसे उभारले जातील. गोल्ड मॅन सॅच या वित्तसंस्थेकडून कंपनीने जे कर्ज घेतले होते ते नियमानुसार फेडण्यास कंपनीला जमले नाही. त्यामुळे आता कंपनी घाईघाईत कर्ज उभे करून वित्तसंस्थेचे कर्ज फेडणार आहे.

मागील वर्षी फार्मइझी कंपनीने आयपीओ आणण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नंतर हा आयपीओ रद्द करण्यात आला. त्यानंतर कंपनीच्या शेअरची किंमत 130 रुपयापर्यंत पोहचली होती. मात्र, नंतर शेअर्स खाली आला. कंपनीचा डायग्नॉस्टिक सेंटर आणि ऑनलाइन औषध विक्रीचा व्यवसाय मागील काही वर्षांपासून वाढत आहे.