जागतिक कमॉडिटी बाजारात क्रूडचा भाव कमी होत असला तरी पेट्रोलियम कंपन्यांनी आज बुधवारी 11 जानेवारी 2023 रोजी इंधन दर जैसे थेच ठेवले. जवळपास सात महिने देशभरात पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर आहे.
मुंबईत आज बुधवारी एक लिटर पेट्रोलचा भाव 106.31 रुपये इतका आहे. एक लिटर डिझेलसाठी मुंबईत 94.27 रुपये मोजावे लागत आहे. आज दिल्लीत एक लिटर पेट्रोलचा भाव 96.72 रुपये इतका आहे. दिल्लीत डिझेलचा दर 89.62 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल दर 102.63 रुपये आणि डिझेलचा भाव 94.24 रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेलचा भाव 92.76 रुपये इतका आहे. नोएडामध्ये एक लिटर पेट्रोलचा भाव 96.79 रुपये आणि डिझेलचा भाव 89.96 रुपये इतका आहे.
वर्ल्ड कमॉडिटी मार्केटमध्ये क्रूडच्या किंमतीतील घसरण सुरुर आहे. आज बुधवारी यूएस. टेक्सासमध्ये क्रूडचा भाव 0.8% ने कमी झाला. तो 74.53 डॉलर इतका खाली आला आहे. त्याशिवाय ब्रेंट क्रूड ऑइलच्या किंमतीत 62 सेंट्सची घसरण झाली असून प्रॅती बॅरल ब्रेंट क्रूडचा भाव 79.48 डॉलर इतका आहे.
देशभरात 21 मे 2022 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत शेवटचा बदल झाला होता. महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 8 रुपयांनी तर डिझेलवरी उत्पादन शुल्क 6 रुपयांनी कमी केले होते. भारतात पेट्रोलिय नियंत्रणमुक्त केल्यानंतर पेट्रोल, डिझेल, आणि घरगुती गॅस यांच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाशी संलग्न करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचा किरकोळ भाव जाहीर केला जातो. पेट्रोल आणि डिझेलवर वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क आकारले जाते.