पेट्रोलियम कंपन्यांनी आज सोमवारी 6 फेब्रुवारी 2023 रोजी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई या प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल दर जैसे थेच आहेत. गेल्या आठ महिन्यांत पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर जैसे थेच ठेवले असून ग्राहकांना महाग इंधन खरेदी करावे लागत आहे.
यापूर्वी मे 2022 मध्ये पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 8 रुपयांनी तर डिझेलवरील उत्पादन शुल्क 6 रुपयांनी कमी केले होते. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले होते. केंद्र सरकारच्या आवाहनानंतर भाजपशासित राज्यांनी इंधनावरील मूल्यवर्धित टॅक्स कमी केला होता. मात्र मे महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल झालेला नाही.
जागतिक कमॉडिटी बाजारात क्रूडचा भाव 80 डॉलरवर गेला आहे. चलन बाजारात रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत 82.42 रुपये इतके आहे. त्यामुळे तेल आयातीसाठी पेट्रोलियम कंपन्यांना जादा खर्च करावा लागत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बीपीसीएल, एचपीसीएल आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या तीन कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेल विक्रूतून 21000 कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे.
आज सोमवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव 106.31 रुपये असून डिझेलसाठी 94.27 रुपये इतका दर आहे. दिल्लीत एक लीटर पेट्रोलचा भाव 89.62 रुपये असून डिझेलचा दर 92.72 रुपये इतका आहे. कोलकात्ंयात आजचा पेट्रोलचा भाव 106.03 रुपये आणि डिझेलचा भाव 92.76 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल दर 102.63 रुपये आणि डिझेल दर 94.24 रुपये इतका आहे.