जागतिक कमॉडिटी बाजारात क्रूडचा भाव वाढत असला तरी पेट्रोलियम कंपन्यांनी तूर्त इंधन दरवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. आज सोमवारी 30 जानेवारी 2023 रोजी देशभरात पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल झाला आहे. तब्बल आठ महिन्यांहून अधिक काळ पेट्रोल आणि डिझेलचा भाव 'जैसे थे'च आहे.
आज सोमवारी मुंबईत एक लिटर पेट्रोलचा भाव 106.31 रुपये इतका आहे. एक लिटर डिझेलसाठी मुंबईत 94.27 रुपये मोजावे लागत आहे.आज दिल्लीत एक लिटर पेट्रोलचा भाव 96.72 रुपये इतका आहे. दिल्लीत डिझेलचा दर 89.62 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल दर 102.63 रुपये आणि डिझेलचा भाव 94.24 रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेलचा भाव 92.76 रुपये इतका आहे. नोएडामध्ये एक लिटर पेट्रोलचा भाव 96.79 रुपये आणि डिझेलचा भाव 89.96 रुपये इतका आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात क्रूडचा भाव 90 डॉलरवर गेला आहे. त्यामुळे कंपन्यांवरील दबाव वाढला आहे.
यापूर्वी 21 मे 2022 रोजी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत शेवटचा बदल झाला होता. केंद्र सरकारने महागाई कमी करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 8 रुपयांनी तर डिझेलवरी उत्पादन शुल्क 6 रुपयांनी कमी केले होते.
पेट्रोल आणि डिझेल दर आंतरराष्ट्रीय बाजाराशी संलग्न
पेट्रोल, डिझेल, आणि घरगुती गॅस यांच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधन दरांशी संलग्न आहेत. दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचा किरकोळ भाव जाहीर केला जातो. पेट्रोल आणि डिझेलवर वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क आकारले जाते. यात सेंट्रल एक्साईज, व्हॅट हे कर आकारले जातात. त्यामुळे इंधन दर राज्यनिहाय वेगवेगळा आहे.