Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Petrol Diesel Rate Today: क्रूडचा भाव वाढला, जाणून घ्या आजचा तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव

Petrol Diesel Price Today In Mumbai

Petrol Diesel Rate Today: आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचा भाव वाढल्याने पेट्रोलियम कंपन्यांवरील दबाव वाढला आहे. मात्र तूर्त कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर ठेवण्याल प्राधान्य दिल्याचे दिसून येते. मुंबईत पेट्रोलचा भाव 106 रुपयांवर असून डिझेल 94 रुपये प्रति लिटर आहे.

आंतरराष्ट्रीय कमॉडिटी बाजारात क्रूडच्या किंमतींत तेजी दिसून आली आहे. क्रूडचा भाव 81 डॉलरवर गेला असून ब्रेंट क्रूडचा दर 87.47 डॉलर प्रती बॅरल झाला आहे. यात गुरुवारी सरासरी 2% वाढ झाली. मात्र पेट्रोलियम कंपन्यांनी आज शुक्रवारी 27 जानेवारी 2023 रोजी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला.

मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरांत मागील आठ महिन्यांपासून इंधन दर जैसे थेच आहेत. आज शुक्रवारी सलग 252 व्या दिवशी देशभरात पेट्रोल आणि डिझेलचा भाव जैसे थेच आहे. (Petrol and Diesel Price Remain Unchanged on Today 27th Jan 2023)

मुंबईत एक लिटर पेट्रोलचा भाव 106.31 रुपये इतका आहे. एक लिटर डिझेलचा भाव 94.27 रुपये इतका आहे. दिल्ली एक लिटर पेट्रोलसाठी 96.72 रुपये आणि 89.62 रुपये इतका दर आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव 106.03 रुपये आणि डिझेलचा भाव 92.76 रुपये इतका आहे. चेन्नईत  पेट्रोलसाठी 102.63 रुपये आणि डिझेलसाठी  94.24 रुपये इतका दर आहे. 

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनी मार्चच्या तिमाहीत उच्चांकी स्तर गाठला होता. इंधन दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने 21 मे 2022 रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. या दर कपातीनंतर पेट्रोलचा भाव 8 रुपये प्रती लिटर आणि डिझेलचा भाव  6 रुपये प्रति लिटरने कमी झाला होता. केंद्र सरकारच्या शुल्क कपातीनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओदिशा, केरळ या राज्यांनी इंधनावरील व्हॅट कमी केला होता.

27-01-23-petrol-diesel-rate.jpg

क्रूड ऑइलमधील तेजीची कारणे

- आंतरराष्ट्रीय बाजारात गुरुवारी क्रूड ऑईलचा भाव 2% ने वधारला.

- क्रूडचा भाव 81 डॉलरवर गेला असून ब्रेंट क्रूडचा दर 87.47 डॉलर प्रती बॅरल झाला.

- अमेरिकेतील सकारात्मक आर्थिक आकडेवारीचा परिणाम कमॉडिटी मार्केटवर दिसून आला .

- यूएसमधील क्रूडचा साठा 533000 बॅरलने वाढून तो 448.5 मिलियन बॅरल इतका झाला.

- चीनमध्ये क्रूड ऑइलची मागणी वाढली, कोरोना संकटातून चीन हळुहळू सावरत असल्यानेच मागणी वाढली.