Petrol and Diesel Rate: देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये आज बुधवारी कोणताही बदल झाला नाही. इंधनाचे दर स्थिर आहेत. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 96.72 रुपये आहे तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 106.31 रुपये आहे तर डिझेलचे दर 94.27 रुपये आहे. राज्याराज्यातील पेट्रोल-डिझेलचे दर वेगवेगळे असतात. व्हॅट, वाहतूक खर्च आणि स्थानिक कर आकारणीमुळे दर बदलतात.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनी मार्चच्या तिमाहीत उच्चांकी स्तर गाठला होता. इंधन दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने 21 मे 2022 रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. या दर कपातीनंतर पेट्रोलचा भाव 8 रुपये प्रती लिटर आणि डिझेलचा भाव 6 रुपये प्रति लिटरने कमी झाला होता. केंद्र सरकारच्या शुल्क कपातीनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा, केरळ या राज्यांनी इंधनावरील व्हॅट कमी केला होता. तर काही राज्यांनी सेस लागू केला होता.
प्रमुख शहरांतील पेट्रोल- डिझेलचे दर
शहर | पेट्रोल | डिझेल |
कोलकाता | 106.03 | 92.76 |
बंगळुरु | 101.94 | 87.89 |
मुंबई | 106.31 | 94.27 |
पुणे | 106.54 | 93.04 |
लखनऊ | 96.57 | 89.76 |
दिल्ली | 96.72 | 89.62 |
पेट्रोल, डिझेल, आणि घरगुती गॅस यांच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधन दरांशी संलग्न आहेत. दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचा किरकोळ भाव जाहीर केला जातो. पेट्रोल आणि डिझेलवर वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क आकारले जाते. यात सेंट्रल एक्साईज, व्हॅट हे कर आकारले जातात. त्यामुळे इंधन दर राज्यनिहाय वेगवेगळा आहे.