Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Personal Loan: वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करताय? जाणून घ्या व्याजदर

Personal Loan

वैयक्तिक कर्जाच्या (Personal Loan) मदतीने तुम्ही तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकता. या कर्जाचा पद्धतशीर आणि शिस्तबद्ध वापर करून, तुम्ही एक चांगला क्रेडिट स्कोअर प्रोफाइल (Credit Score Profile) तयार करू शकता.

आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी अनेकदा काही लोक वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घेत असतात. कर्जाचे नियमित हफ्ते भरल्यास तुम्ही तुमचा एक चांगला क्रेडीट स्कोअर प्रोफाईल बनवू शकता. ज्याद्वारे भविष्यात आर्थिक व्यवहार करताना , कर्ज घेताना तुम्हांला काही अडचणी येणार नाहीत. वैयक्तिक कर्जाचा विचार करता बँक आणि  Non-Banking Financial Company (NBFC), म्हणजेच वित्तपुरवठा करणाऱ्या कंपन्यांचा व्याजदर वेगवेगळा असतो. तुमच्या खिशाला परवडतील असे व्याजदर देणाऱ्या बँक खालीलप्रमाणे:

बँक ऑफ इंडिया (Bank of India) 
बँक ऑफ इंडियामध्ये वैयक्तिक कर्जावरील व्याज दर 9.10 टक्क्यांपासून सुरू होतो. 20 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज देण्याची सुविधा ही बँक देते. बँक ऑफ इंडियामध्ये वैयक्तिक कर्जाचा कालावधी 84 महिन्यांपर्यंत आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) 
या बँकेतील वैयक्तिक कर्जावरील प्रारंभिक व्याज दर 9.25 टक्के इतका आहे. 20 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज बँकेत दिले जाऊ शकते. बँकेतील कर्जाचा कालावधी 84 महिन्यांपर्यंत आहे.

पंजाब नॅशनल बँक (PNB)
देशातील दुसरी सर्वात मोठी सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक म्हणजेच PNB. या बँकेत वैयक्तिक कर्जावर 10.15 टक्के ते 16.70 टक्के व्याजदर आहे. बँकेतील कर्जाची रक्कम 10 लाखांपर्यंत आहे. बँकेतील वैयक्तिक कर्जाचा कालावधी 60 महिन्यांपर्यंत आहे.

करूर वैश्य बँक (Karur Vysya Bank)
करूर वैश्य बँकेत वैयक्तिक कर्जावरील व्याज दर 10.20 टक्के ते 13.20 टक्के इतका आहे. यामध्ये 10 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज घेता येते. कर्जाचा कालावधी 12 ते 60 महिन्यांपर्यंत आहे.

IDBI बँक
या बँकेचा वैयक्तिक कर्जावर 10.25 टक्के ते 15.50 टक्के व्याजदर आहे. व्याजाचा कालावधी 12 ते 60 महिन्यांचा आहे.

फेडरल बँक (Federal Bank)
या खाजगी बँकेचा वैयक्तिक कर्जावर 10.49 टक्के ते 17.99 टक्के व्याजदर आहे. बँकेत 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येते. कर्जाचा कालावधी 48 महिन्यांचा आहे.

IDFC फर्स्ट बँक (IDFC First Bank) 
या खाजगी बँकेत वैयक्तिक कर्जावर 10.49 टक्के व्याजदर आहे. या बँकेतील कर्जाचा कालावधी 6 ते 60 महिन्यांचा आहे. कर्जाची कमाल मर्यादा एक कोटी रुपयांपर्यंत आहे.

आम्ही तुम्हांला सांगू इच्छितो की वैयक्तिक कर्ज वेळेवर आणि मुदतीत फेडणे गरजेचे आहे. वैयक्तिक कर्ज मुदतीआधी (Pre Closed) देखील फेडले जाऊ शकते. वेळेवर कर्जाचे हफ्ते न भरल्यास तुमच्या सिबिल स्कोअर (CIBIL Score) वर त्याचा परिणाम होऊ शकतो. वैयक्तिक कर्जावरचे व्याजदर वेळोवेळी बदलत असतात, त्याबद्दल प्रत्यक्षरित्या बँकेत जाऊन चौकशी करा आणि खिशाला परवडेल अशाच बँकेतून कर्ज घ्या.