Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Personal Loan: वैयक्तिक कर्ज घेत असाल, तर कमी व्याजदरासाठी 'या' गोष्टींकडे नक्की लक्ष द्या

Personal Loan

Personal Loan: बँकांकडून वैयक्तिक कर्ज कमी वेळेत उपलब्ध करून दिले जाते. हे कर्ज वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले जाते. या कर्जावरील व्याजदर सर्वात जास्त असतो. त्यामुळे तुम्हीही वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर काही गोष्टींकडे नक्की लक्ष द्या. ज्यामुळे कमी व्याजदर मिळण्यासाठी मदत होऊ शकते.

छोट्या मोठ्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी सध्या बँकांकडून वैयक्तिक कर्ज (Personal Loan) त्वरित उपलब्ध करून दिले जाते. हे कर्ज सर्व बँका वेगवेगळ्या व्याजदरासह उपलब्ध करून देतात. अर्जदाराच्या पात्रतेनुसार आणि क्षमतेनुसार वैयक्तिक कर्जावरील व्याजदर कमी जास्त करण्यात येतो. वैयक्तिक कर्जाचा व्याजदर हा वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतो. यामध्ये क्रेडिट हिस्ट्री (Credit History), सिबील स्कोर (CIBIL Score) अशा अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आलेला असतो. जर तुम्हीही बँकेतून वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर कमी व्याजदरात वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी कोणत्या घटकांवर लक्ष द्यायला हवे, जाणून घेऊयात.

चांगला सिबील स्कोअर ठेवणे

कोणतीही बँक अर्जदाराला कर्ज देण्यापूर्वी सर्वप्रथम अर्जदाराचा सिबील स्कोर (CIBIL Score) तपासते. सिबील स्कोअर तुम्ही यापूर्वी घेतलेली कर्ज आणि क्रेडिट कार्ड इत्यादींची हिस्ट्री पाहून तयार केला जातो. हा सिबिल स्कोअर पाहून बँका अर्जदाराला किती रकमेचे कर्ज देता येऊ शकते, ते निश्चित करतात. अर्जदाराचा सिबील स्कोअर जितका जास्त असेल, तितके जास्त कर्ज परवडणाऱ्या व्याजदरात उपलब्ध करून दिले जाते. 750 किंवा त्याहून जास्त सिबील स्कोअर असेल, तर तो चांगला मानला जातो. अशा व्यक्तीला बँक पटकन कर्ज उपलब्ध करून देते. म्हणूनच सिबील स्कोअर चांगला ठेवणे गरजेचे आहे.

उत्पन्नावर आधारित व्याजदर

कोणतीही बँक अर्जदाराला कर्ज देण्यापूर्वी, त्याची कर्ज फेडण्यासाठी सक्षम आहे की नाही ते तपासते. यासाठी बँक सर्वात प्रथम उमेदवाराचे उत्पन्न तपासते. याच उत्पन्नावर आधारित उमेदवाराला किती कर्ज उपलब्ध करून दिले जाईल ते निश्चित केले जाते आणि मगच कर्ज देण्याची जोखीम पत्करते. उमेदवाराने किती रकमेसाठी अर्ज केला आहे आणि त्याचे उत्पन्न किती आहे, यावर आधारित बँक व्याजदर निश्चित करते.

रेपो दर आणि अर्जदाराची लॉयल्टी

आरबीआयच्या रेपो दराचा (Repo Rate) परिणाम बँकांच्या व्याजदरावर होताना पाहायला मिळतो. रेपो दरात वाढ किंवा घट झाली की, बँकांच्या व्याजदरात वाढ किंवा घट होताना पाहायला मिळते. याच रेपो दराचा परिणाम वैयक्तिक कर्जाच्या व्याजदरावर देखील होतो. जर अर्जदाराने आधीच कर्ज घेतले असेल, तर बँक अर्जदाराला किती प्रमाणात कर्ज उपलब्ध करून दिले जाऊ शकते, ते निश्चित करते. याशिवाय देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती आणि बाजारातील इतर घटकांचाही वैयक्तिक कर्जाच्या व्याजदरावर परिणाम होतो. कर्ज देताना संबंधित बँकेशी अर्जदाराचे नाते कसे आहे, हे देखील पाहिले जाते.

Source: hindi.news18.com