पर्सनल लोन हा असुरक्षित लोनचा पर्याय आहे. जो कमी अवधीसाठी दिला जातो. तसेच, अन्य लोनच्या तुलनेत पर्सनल लोनसाठी रक्कमही कमीच मिळते. विशेष म्हणजे असुरक्षित लोन असल्याने तुम्हाला काही गहाण ठेवायची गरज पडत नाही. त्यामुळेच सुरक्षित लोनच्या तुलनेत पर्सनल लोनचा व्याजदर अधिक असतो. पण, तुम्हाला काही इमर्जन्सी असल्यास, ती भागवण्यासाठी पर्सनल लोन चांगला पर्याय ठरु शकतो. कारण, अन्य लोनच्या तुलेनत पर्सनल लोन तुम्हाला कमी अवधीत मिळू शकते.
पर्सनल लोनसाठी क्रेडिट स्कोअर महत्त्वाचा का आहे?
पर्सनल लोनसाठी लेंडर्स तुम्हाला काही गहाण ठेवायला लावत नाही. मात्र, लेंडर्स तुमच्या पर्सनल लोनचा अर्ज स्वीकारण्याआधी क्रेडिट स्कोअर चेक करतात. जर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी किंवा सिबिल स्कोअर नसल्यास, तुमच्या क्रेडिट पात्रतेचे मूल्यांकन करणे कठीण होते. तेव्हा मग बॅंक तुमच्या लोनचा अर्ज रोखू शकते. तसेच, जर कमी क्रेडिट स्कोअर असल्यास अर्जदार कमी व्याजदर, अधिक मिळणारी लोन रक्कम आणि लोन फेडण्यासाठी मिळणारा जास्त अवधी यांचा लाभ घेऊ शकत नाही.
या गोष्टी ट्राय करुन मिळवा पर्सनल लोन
- गहाण ठेवण्याच्या अटीवर करा अर्ज
जर तुमचा सिबिल स्कोअर उच्च असेल तर तुम्हाला काहीही गहाण ठेवायची गरज पडत नाही. तसेही पर्सनल लोन असुरक्षित लोनमध्ये येते. त्यामुळे काही देखील गहाण ठेवायची गरज पडत नाही. मात्र, एखाद्याची क्रेडिट हिस्ट्री नसेल तर अशावेळी ते त्यांच्या जवळील एखादी वस्तू गहाण ठेवून पर्सनल लोन घेऊ शकतात.
- लोन फेडण्याची पात्रता करा सिद्ध
जर तुमच्याकडे उत्पन्नाचा स्थिर पर्याय असेल तर तुम्ही तुमची क्रेडिट पात्रता सिद्ध करुन सहज पर्सनल लोन मिळवू शकता. यासाठी तुम्हाला उत्पनाचा पुरावा म्हणून लेंडर्सना सॅलरी स्टेटमेंट किंवा पेस्लिप दाखवावी लागू शकते.
- लेंडर्सच्या पात्रतेचे निकष करा मॅच
पर्सनल लोनसाठी मार्केटमध्ये वेगवेगळ्या लेंडर्सचे वेगवेगळे पात्रता निकष असतात. त्यामुळे ज्यांची क्रेडिट हिस्ट्री नाही, ते पर्सनल लोन मिळवण्याची अधिक संधी प्राप्त करण्यासाठी लेंडर्सच्या पर्सनल लोन पात्रतेचे निकष पूर्ण करू शकतात. तसेच, त्यानुसार लोन मिळवू शकतात.