Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tata Capital Personal Loan : टाटा कॅपिटलचे ऑनलाईन पर्सनल लोन काढायचे आहे? जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

Tata Capital Personal Loan : टाटा कॅपिटलचे ऑनलाईन पर्सनल लोन काढायचे आहे? जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

टाटा कॅपिटलकडून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या वैयक्तिक कर्जाचा व्याजदर हा वार्षिक 10.99% पासून ते 34.99 टक्के इतका आहे. तसेच ग्राहकांच्या पात्रतेनुसार 40 हजार ते 35 लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होते. तसेच या कर्जाचा परत फेडिचा कालावधी 7 वर्षांपर्यंत आहे. या वैयक्तिक कर्जासाठी ग्राहकांकडून कर्जाच्या रकमेच्या 1% ते 3.5% पर्यंत प्रक्रिया शुल्क आकारले जाते.

सध्य स्थितीत महागाई सर्वच क्षेत्रात वाढली आहे. त्यामुळे वैद्यकीय आणीबाणी, शैक्षणिक फी, किंवा इतर आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी कित्येकजण वैयक्तित कर्ज घेतात. मार्केटमध्ये वैयक्तिक कर्ज (Personal Loan) देणाऱ्या अनेक वित्तीय संस्था आहेत. त्याप्रमाणे टाटा कॅपिटल (Tata Capital) देखील काही मिनिटात वैयक्तित कर्ज उपलब्ध करून देत आहे. टाटा कॅपिटलच्या पर्सनल लोनसाठी कशाप्रकारे अर्ज करायचा याबाबतची प्रक्रिया आज आपण जाणून घेऊ.

टाटा कॅपिटल वैयक्तिक कर्ज

टाटा कॅपिटलने आपल्या ग्राहकांसाठी आता ऑनलाईन वैयक्तिक कर्ज (Online Personal Loan) देण्याची सोय केली आहे.. टाटा कॅपिटलकडून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या वैयक्तिक कर्जाचा व्याजदर हा वार्षिक 10.99% पासून ते 34.99 टक्के इतका आहे. तसेच ग्राहकांच्या पात्रतेनुसार 40 हजार ते 35 लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होते. तसेच या कर्जाचा परत फेडिचा कालावधी  7 वर्षांपर्यंत आहे. या वैयक्तिक कर्जासाठी ग्राहकांकडून कर्जाच्या रकमेच्या 1% ते 3.5% पर्यंत प्रक्रिया शुल्क आकारले जाते. दरम्यान, कोणत्याही वित्तीय संस्थेकडून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असणे आवश्यक आहे.

वैयक्तिक कर्जासाठी कसा कराल अर्ज?

टाटा कॅपिटलमधून तुम्हाला वैयक्तित कर्ज काढायचे असेल तर तुम्हाला टाटा कॅपिटलच्या संकेतस्थळावर जायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला काही बेसिक डिटेल्स, त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती, कर्जासंदर्भात तपशील भरणे आवश्यक आहे.

टाटा कॅपिटलवर लॉगिन

यासाठी प्रथम तुम्हाला https://www.tatacapital.com हे संकेतस्थळ सुरू करायचे आहे. त्यानंतर  तुम्हाला तिथे New Customer या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या नोकरी, व्यवसाय या पैकी पर्याय निवडून तुमचा मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर  OTP क्रमांक प्राप्त होईल. त्यानंतर तुम्हाला कर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अर्ज प्राप्त होईल. 

वैयक्तिक माहिती भरा-

टाटा कॅपिटलच्या वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करताना तुम्हाला सुरुवातीला Basic Details या पर्यायावर क्लिक करायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा पॅनकार्ड(PAN CARD)क्रमांक, नाव, जन्मतारीख, शहराचे नाव इत्यादी माहिती भरून continue या बटनावर क्लिक करायचे आहे.

वैयक्तिक आर्थिक तपशील-

या स्टेपमध्ये तुम्हाला तुम्ही व्यावसायिक अथवा नोकरदार असाल, त्यानुसार तुमचे महिन्याचे उत्पन्न किंवा पगार, कंपनीचे नाव ईमेल इत्यादी माहिती भरायची आहे. तसेच तुमचा पगार कशा प्रकारे होतो. चेक,थेट खात्यात अशा प्रकारचा तपशील या स्टेपमध्ये भरायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पुढील स्टेपसाठी प्रोसीड बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होईल.

 कागदपत्रे अपलोड करा 

त्यानंतरच्या स्टेपमध्ये तुम्हाला वैयक्तिक कर्जाशी संबंधित कागदपत्रे अपलोड करायची आहेत. तुमचे फोटो, पॅन कार्ड, ओळखपत्र, उत्पन्नाचा पुरावा, किती पाहिजे

पडताळणी आणि वितरण-

कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला TRACK MY APPLICATION या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्ही कर्जास पात्र आहात का नाही या संबधीची माहिती उपलब्ध होईल. यासाठी तुम्हाला तुमचा पॅन नंबर किंवा मोबाईल क्रमांक टाकून लॉगिन करायचे आहे. त्यानंतर तम्हाला ओटीपी प्राप्त होईल. त्यानंतर तुम्हाला केवायसी पूर्ण करायची आहे. तुमच्या बँकेचा तपशील द्यायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला मंजूर कर्ज, त्यावर आकारण्यात येणारे व्याज इत्यादी माहि्ती प्राप्त होईल. ती संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतरच तुम्ही कर्जासाठी पुढील प्रक्रिया पूर्ण करावी. त्यानंतर पैसे तुमच्या बँक खात्यात जमा केले जातील.