आपण एखाद्या महत्वाच्या गरजेसाठीच शक्यतो पर्सनल लोन घेण्याच्या वाट्याला जातो. तसेही त्यावर व्याज जास्त द्यावे लागते. पण, दुसरा पर्याय नसल्याने पर्सनल लोन घ्यावे लागते. सगळे पेपर्स ठीक असल्यास कोणताही अडथळा येत नाही. कारण, यासाठी बँक वैयक्तिक उत्पन्न, वय, लोन घेतले असल्यास त्याचे डिटेल्स आणि सिबिल स्कोअर किंवा क्रेडिट स्कोअर पाहूनच लोन द्यायचे की नाही याचा निर्णय घेते. त्यामुळे या गोष्टी ठीक असल्या तरच आपल्याला लोन मिळते. ठीक नसल्या आणि त्या ठीक करायच्या असल्यास, आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत.
Table of contents [Show]
पर्सनल लोनसाठी क्रेडिट स्कोअरचे महत्व
पर्सनल लोनसाठी अर्ज करताना क्रेडिट स्कोअर चांगला असणे खूप महत्वाचे आहे. क्रेडिट स्कोअरची रेंज 750 असल्यास तो सर्वात चांगला असल्याचे मानले जाते. त्यामुळे तुम्हाला सहज लोन मिळायला मदत होते. तेच जर क्रेडिट स्कोअर खराब असल्यास तुम्हाला लोन मिळायला उशीर लागतो. तसेच, व्याजदरही जास्त आकारला जातो. एखाद्यावेळेस तुमचा अर्ज रिजेक्टही केला जातो. त्यामुळे क्रेडिट स्कोअर मेंटेन करणे हे आपल्याच हातात असते. तो कसा मेंटेन करायचा हे आपण आज पाहणार आहोत.
क्रेडिट स्कोअर नियमित तपासा
क्रेडिट स्कोअर नियमित तपासायची सवय लावून घ्या. कारण, CIBIL जे की क्रेडिट स्कोअरची माहिती देते, त्यांच्याकडून एखाद्यावेळेस चुकीचा क्रेडिट स्कोअर अपडेट होऊ शकतो. त्यामुळे तुमचा स्कोअर कमी होण्याची शक्यता असते. याविषयी तुम्हाला काही चूक आढळल्यास संबंधित बँकांना किंवा क्रेडिट एजन्सींना लगेच कळवा.
वेळेवर बाकी भरा
क्रेडिट स्कोअरचा सगळा खेळ तुमचे हप्ते भरण्यावर आहे, त्यामुळे एखादा हप्ता जरी थकला तरी तुम्हाला दंड भरावा लागतो. या गोष्टीचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होतो. त्यामुळे वेळेवर हप्ते भरल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारायला मदत होते.
जुने क्रेडिट कार्ड ठेवा सांभाळून
आधीचे सर्व जुने क्रेडिट कार्ड बंद करण्याऐवजी सांभाळून ठेवा, त्यामुळे तुमची क्रेडिट कार्ड हिस्ट्री समजू शकते. तसेच, यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर वाढण्यासही मदत होऊ शकते. कारण, हे तुमची क्रेडिट हिस्ट्री बनवण्यास मदत करते. त्यावरुन तुमच्या आधीच्या व्यवहारांची माहिती होते.
एकाचवेळी अनेक लोन टाळा
तुम्ही एकाचवेळी अनेक लोन घेतले असल्यास, त्याचा तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीवर परिणाम होतो. त्यामुळे एक लोन फिटल्यावर तुम्ही दुसऱ्या लोनसाठी अर्ज करु शकता. कारण, एकाचवेळी दोन-तीन लोन असल्यास एखादा तरी हप्ता थकीत राहतो. त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर वाईट परिणाम होतो.
आता तुमचे लोन फेटाळले आणि त्याचे कारण क्रेडिट स्कोअर असल्यास वरील पद्धतीचा वापर करुन, तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर मेंटेन करु शकता. तसेच, तो पाहिजे त्या रेंजमध्ये आणून त्वरित कर्ज मिळवू शकता.