Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Insta Personal Loans : पैशांची अडचण आहे? मग 30 मिनिटांपेक्षा कमी वेळात मिळवा लोन, 'ही' कंपनी करतेय ऑफर!

Insta Personal Loans : पैशांची अडचण आहे? मग 30 मिनिटांपेक्षा कमी वेळात मिळवा लोन, 'ही' कंपनी करतेय ऑफर!

पैशांची खूप गरज आहे आणि लोन मिळवायचे म्हटल्यावर, जास्त वेळ लागू शकतो. कारण, लेंडरने मागितलेल्या सर्व पेपर्सची पूर्तता केल्याशिवाय लोन मिळणे, थोडे मुश्किलच असते. त्यामुळे तुम्हाला जर त्वरित लोन पाहिजे असल्यास, तुम्ही बजाज फायनान्सच्या (Bajaj Finance ) इन्स्टा पर्सनल लोनचा (Insta Personal Loans) फायदा घेऊ शकता. अवघ्या 30 मिनिटांत खात्यावर लोन ट्रान्सफर होणार आहे. यासाठी काय आवश्यक आहे जाणून घेऊया.

कोणतीही आर्थिक अडचण पैशांजवळ येऊनच थांबते. बऱ्याचवेळा पैसा असतो, कधी नसतो. मात्र, पैसा नसला की खूप धावपळ होते. पण, तुम्ही जर बजाज फायनान्सच्या सुविधेचा यापूर्वी लाभ घेतला असल्यास, तुमच्यासाठी लोन मिळवणे सोपे होणार आहे. कारण, बजाज फायनान्सने एक ऑफर आणली आहे. त्याद्वारे निवडक ग्राहकांना म्हणजे त्यांच्या सिस्टिमध्ये नोंदणी असलेल्या ग्राहकांना 30 मिनिटांपेक्षा कमी वेळात लोन त्वरित मिळणार आहे.

 यासाठी प्री-अप्रूव्ह्ड लोनची रक्कम 12,76,500 रुपयांपर्यत असणार आहे. तर जे नवीन ग्राहक आहेत त्यांना त्याचा मोबाईल नंबर आणि ओटीपी शेअर करून त्यांना त्वरित मिळणाऱ्या प्री-असाईन (pre-assigned) लोनच्या रकमेची मर्यादा जाणून घेता येणार आहे.

बजाज फायनान्सच्या ग्राहकांना प्री-असाईन रक्कम पाहायची असल्यास, मोबाईल नंबर आणि ओटीपी टाकणे आवश्यक आहे. तसेच, नवीन ग्राहक आणि ज्या ग्राहकांनी ऑफर पाहिली नाही किंवा त्यांना प्री असाईन रकमेपेक्षा जास्त लोन हवे असल्यास, त्यांना रेग्युलर अर्ज करुन ऑनलाइन प्रक्रियेला सामोर जावे लागणार आहे.

लोनसाठी खालील स्टेप्स फाॅलो करा

  • बजाज फिनसर्व्ह (Bajaj Finserv) वेबसाईट'वर इन्स्टा पर्सनल लोन पेजला भेट द्या.
  • तुम्ही पेजवरील चेक ऑफर बटणा'वर क्लिक केल्यास ऑनलाइन फॉर्म उघडेल.
  • तुमची प्रोफाईल ऑथेंटिकेट करण्यासाठी तुमचा 10-अंकी फोन नंबर आणि OTP टाका.
  • तुमच्या स्क्रीनवर आता प्री-असाईन लोन मर्यादेसह ऑफर दिसेल. तुमच्याजवळ ती रक्कम स्वीकारण्याचा किंवा तुम्हाला हवी असलेली रक्कम निवडण्याचा पर्याय आहे.
  • तुमच्या सोयीनुसार लोन फेडण्याची मुदत निवडा.
  • ऑनलाइन फॉर्म पूर्ण करण्यासाठी पुढे जा'वर क्लिक करा

वर सांगितल्याप्रमाणे ऑनलाइन प्रक्रिया नवीन ग्राहक आणि सध्याच्या ग्राहकांसाठी बदलू शकते. काही ग्राहकांना इन्स्टा पर्सनल लोन अर्ज पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त कागदपत्रे द्यावे लागू शकतात.

लोन घेण्याचे फायदे

तुम्ही जर बजाज फायनान्सचे ग्राहक असल्यास, तुम्हाला कागदपत्रे जमा करायची गरज नाही. तसेच, लोनसाठी अर्ज केल्यानंतर 30 मिनिट ते 4 तासांच्या आत पैसे तुमच्या अकाउंटवर ट्रानस्फर होणार आहेत. तेच निवडक ग्राहकांसाठी 30 मिनिटांपेक्षा कमी वेळात लोनची रक्कम मिळणार आहे.  याचबरोबर लोनची रक्कम जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पूर्ण अर्ज भरण्याची गरज नाही. 

यासाठी फक्त मोबाईल नंबर आणि ओटीपी टाकून लगेच लोनची रक्कम जाणून घेता येणार . तसेच, लोन घेण्यासाठी बजाज फायनान्सच्या ग्राहकांना इन्कम दाखवण्याची गरज पडणार नाही. एवढेच नाहीतर लोन फेडण्याची मुदत तुमच्या बजेटात आहे की नाही हे पाहून तुम्ही लोन घेण्याचा निर्णय घेऊ शकता. तसेच, लोन घेण्यासाठी कोणतेही छुपे चार्जेस आकारले जाणार नसल्याची माहिती कंपनीच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.