Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sneaker Painting: घरच्या घरी शूज पेंटिंग करून लोक कमवतायेत लाखो रुपये!

Sneaker Painting

बऱ्याच ऑफिसमध्ये, विशेषतः स्टार्टअप्स मध्ये ड्रेसकोड (Dress Code) अशी काही संकल्पना नाहीये. त्यामुळे फॉर्मलच शूज घाला अशी देखील सक्ती केली जात नाही. त्यामुळे अगदी ऑफिसेस मध्ये देखील पेंटेड स्निकर्स, शूज घालून आलेले कर्मचारी आपल्याला सहज दिसतील. मुंबई, दिल्ली, बेंगळुरू सारख्या कॉस्मोपोलिटीन शहरात तर हे फॅड मोठ्या प्रमाणात दिसते आहे.

Shoes Painting: काय म्हणता? शूज रंगवून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता? होय कमवू शकता! घरच्या घरी करता येणारा हा एक चांगला आणि फायद्याचा व्यवसाय आहे. देशभरात तरुण उद्योजक या व्यवसायात उतरत असून लाखो रुपयांची कमाई करत आहेत. चला तर जाणून घेऊया, काय आहे हा व्यवसाय आणि कसे कमवू शकता घरबसल्या पैसे!

शूज पेंटिंग, एक नवा ट्रेंड 

आजकाल पेंटिंग केलेले शूज घालण्याचा ट्रेंड आहे. फॉर्मल शूज किंवा स्पोर्ट शूज दुकानातून खरेदी केल्यानंतर आहे तशा स्वरूपात वापरण्याचा ट्रेंड आता जुना होत चाललाय की असे वाटू लागले आहे. प्लेन शूजवर वेगवेगळ्या स्वरूपाची चित्रे, नक्षी काढून ती आकर्षक बनवली जातायेत आणि मुख्य म्हणजे त्याची विक्री देखील होते आहे.

याला स्निकर पेंटिंग देखील म्हटले जाते. स्निकर हा शूजचा एक प्रकार असून कॉलेजमध्ये तरुणाई याचा वापर करते. स्पोर्ट किंवा फॉर्मल शूजची जागा आता बऱ्यापैकी स्निकर्सने घेतली आहे असे चित्र सध्या दिसते आहे.

बऱ्याच ऑफिसमध्ये, विशेषतः स्टार्टअप्स मध्ये ड्रेसकोड (Dress Code) अशी काही संकल्पना नाहीये. त्यामुळे फॉर्मलच शूज घाला अशी देखील सक्ती केली जात नाही. त्यामुळे अगदी ऑफिसेस मध्ये देखील पेंटेड स्निकर्स, शूज घालून आलेले कर्मचारी आपल्याला सहज दिसतील. मुंबई, दिल्ली, बेंगळुरू सारख्या कॉस्मोपोलिटीन शहरात तर हे फॅड मोठ्या प्रमाणात दिसते आहे.

अलीकडेच बीबीसी हिंदीने हरियाणामधील सोनीपत येथील प्रतिभा अंतील या तरुणीची मुलाखत घेतली होती. प्रतिभा स्निकर पेंटींगचा व्यवसाय करते. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ती पेंट केलेली स्निकर्स, शूज विकते. लॉकडाऊनमध्ये तिने या व्यवसायाला सुरुवात केली होती. आजघडीला इंग्लंड, ब्रिटन, अमेरीका आणि इतर देशांमधील ग्राहक प्रतिभासोबत जोडले गेले आहेत.

ऑनलाईन विक्री होत असल्यामुळे देशोविदेशातून प्रतिभाला प्रतिसाद मिळतो आहे. आजघडीला महिन्याला 2 लाख रुपयांचे उत्पन्न केवळ शूज पेंटिंगमधून ती मिळवते आहे.

उत्पादन खर्च कमी, नफा जास्त

प्रतिभा सांगते की, सुरुवातीला कोणत्या शूजवर कोणते रंग वापरायचे हे तिला ठाऊक नव्हतं. हळूहळू तिला कलर, ब्रश, त्याची गुणवत्ता, ग्राहकांची पसंत या सगळ्या गोष्टी समजत गेल्या. प्रतिभाने कुठेही याबाबत व्यावसायिक प्रशिक्षण घेतले नसून ती हे सर्व अनुभवातून शिकली आहे असं ती सांगते.

कस्टमाईज शूजला मागणी

कस्टमाईज शूज म्हणजे हवे तसे पेंटिंग शूजवर करून घेणे होय. कुणाला गिफ्ट देण्यासाठी किंवा स्वतःची आवड म्हणून लोक असे कस्टमाईज शूज बनवून घेत असतात. सध्या अशा शूजला मागणी असल्याचे प्रतिभा सांगते. तरुणाईकडून अशा शूजला मोठी मागणी असते असेही ती सांगते.

युट्युबवर, इन्स्टाग्राम व इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्निकर्स पेंटिंगचे अनेक व्हिडीओ उपलब्ध असून अनेक लोक घरच्या घरी ही कला शिकतायेत. तेव्हा जर तुम्हांला पेंटिंगची, चित्रकलेची किंवा कलाकुसरीची आवड असेल तर तुम्हीही ही कला शिकून पैसे नक्कीच कमवू शकता.