Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पेन्शन योजना : निवृत्तीवेतनासह निवृत्ती नियोजन

पेन्शन योजना : निवृत्तीवेतनासह निवृत्ती नियोजन

पेन्शन योजनेने योग्य रित्या करा निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन आणि जगा आनंदी जीवन

श्रीमंत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लवकर निवृत्त होण्याचे स्वप्न कोण पाहत नाही? पण आपण सर्व काही जवाबदाऱ्यांनी बांधलेलो असतो. काहीजण  कामाशिवाय इतर कशाचाही विचार करू शकत नाहीत आणि काही लोक आर्थिक विवंचनेने  बांधील असतात. आपली जमापुंजी किती दिवस टिकेल ह्या काळजीत आपण नेहमीच असतो आणि त्याच भीतीने भविष्याची तरतूद करण्यासाठी नोकरी व्यवसाय करत असतो. असे असले तरी कधी ना कधी तरी आपल्याला निवृत्त व्हायला लागेलच आणि त्यासाठीची तरतूद आधी करुन ठेवावी लागते.  मासिक पेन्शन हे त्यावरील सगळ्यात चांगले उत्तर ठरते. पण आपण याच्या अधिक तपशीलात जाण्यापूर्वी संपत्तीचे दोन वेगवेगळे टप्पे पाहू - संचय आणि वितरण. 

प्रत्येक व्यक्ती आपल्या कुवतीनुसार संपत्तीची उद्दिष्टे ठरवत असते. यासाठी ती कठोर परिश्रम करते आणि ते ध्येय गाठण्यासाठी नियमितपणे गुंतवणूक करते. जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार आर्थिक सल्लागारांच्या सल्ल्यानुसार गुंतवणूकदार कर्ज  किंवा इक्विटी आणि अन्य गुंतवणुकीची साधने  (बॉन्ड, मुदत ठेवी, PPF, इक्विटी फंड इत्यादी) मध्ये पैसे ठेवण्याची निवड करतात. येथे उद्दिष्ट फक्त गुंतवणूक करुन ठेवणे असते  जेणेकरुन तुम्ही काम करणे थांबवल्यावर तुमच्याकडे पुरेसे आर्थिक उत्पन्न असेल. 

इथे पैसे काढण्याची किंवा वितरणाची सुरुवात होते. पैसे उपभोगण्यासाठी छोट्या टप्प्यांमध्ये  पैसे काढणे सुरू होते. किती बचत झाली आणि नियमितपणे किती काढली यावर हा वितरण टप्पा अवलंबून असतो.


सर्व पेन्शन योजनांमध्ये हे दोन टप्पे असतात. पहिल्या प्रकारचा प्लॅन म्हणजे डिफर्ड अॅन्युइटी प्लॅन ज्यामध्ये तुम्ही निवृत्त होईपर्यंत किंवा काही वर्षांसाठी पैसे गुंतवण्याचे सुरू ठेवता. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर  वितरणाचा टप्पा सुरू होतो. या योजनेचे काही अंतर्गत तोटे आणि फायदे  आहेत. ज्यात कोणताही हमीभाव, जास्त वर्षांसाठी लॉक-इन म्हणजेच पैसे काढू न शकणे आणि जमवलेल्या निधीच्या वापराबाबतची लवचिकता, जास्त शुल्क आणि कर रचना (Tax Slab) यांचा समावेश आहे. याचा स्पष्ट फायदा असा आहे की निवृत्तीनंतर गुंतवणुकदाराला कमाईचा एक स्थिर स्त्रोत प्राप्त होतो.      

दुसरी योजना, तात्काळ अॅन्युइटी पर्याय, ज्यामध्ये वितरणाचा टप्पा जवळजवळ संचयित किंवा गुंतवणुकीच्या टप्प्यासह सुरू होतो. हे सामान्यत: एखाद्या व्यक्तीद्वारे निवडले जाते. ज्याला एकरकमी रक्कम हवी असते. पण त्याचे व्यवस्थापन करण्यात त्या व्यक्तीची अनिश्चिती किंवा अनास्था असते.      

भारतात, राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत पेन्शन योजना उपलब्ध आहेत आणि अनेक खाजगी विमा कंपन्या देखील पेन्शन योजना देतात . पेन्शन ऑफर करणाऱ्या काही आघाडीच्या कंपन्यांमध्ये लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाइफ इन्शुरन्स, बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्स, एचडीएफसी स्टँडर्ड लाइफ इन्शुरन्स यांचा समावेश आहे. या योजना ठराविक कालावधीसाठी हमीपात्र दर किंवा जमा कालावधीच्या काही भागांमध्ये पैसे काढणे, किंवा अनेकदा पैसे काढणे आदी फायदे दिले जातात.       

मुख्य पेन्शन योजनेच्या अटी   

  1. वेस्टिंग कालावधी : तुमची पेन्शन मिळण्यासाठी पहिल्या वार्षिक पेमेंटनंतरची वर्षांची संख्या
  2. वेस्टिंग वय : ज्या वयात तुम्हाला पैसे मिळण्यास सुरुवात होते.
  3. अॅन्युइटी : तुमचे काही ठराविक वय ओलांडल्यानंतर तुम्हाला नियमित मासिक पेन्शन मिळते.
  4. विम्याची रक्कम : तुमचा मृत्यू झाल्यास तुमच्या नॉमिनीला रक्कम मिळते.      
  5. सरेंडर शुल्क : जर तुम्ही तुमची पॉलिसी वेस्टिंग कालावधी संपण्यापूर्वी बंद केली तर त्या कंपनीकडून अधिभार शुल्क आकारले जाते.      
  6. सहभागी योजना : ज्या योजना तुम्हाला इन्श्युरन्स कंपनीने मिळवलेला अतिरिक्त नफा शेअर करण्याची परवानगी देतात.      

थोडक्यात सांगायचे म्हणजे, निवृत्तीचे नियोजन करताना निवृत्ती वेतन हा एक पर्याय आहे. पेन्शन पॉलिसी  खरेदी करताना, त्या योजनेचे फायदे आणि तोटे समजून घेणे, त्याची इतर  प्लॅनसोबत तुलना करणे आणि आपल्या उद्दिष्टांशी जुळणारी आणि कमी खर्चिक पॉलिसी खरेदी करणे.