वाढत्या वयाबरोबर ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. अशावेळी पेन्शन योजना आर्थिक स्थैर्य आणि आधार प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. एलआयसीच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी अशीच एक पेन्शन विमा योजना राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून वयाची 60 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना दरमहिन्याला नियमितपणे पेन्शनचा लाभ मिळते.
वयोवृद्ध नागरिकांसाठीची सरकारची वरिष्ठ पेन्शन विमा योजना नक्की काय आहे व याचा लाभ तुम्ही कशाप्रकारे घेऊ शकता, याविषयी जाणून घेऊयात.
वरिष्ठ पेन्शन विमा योजना काय आहे?
वरिष्ठ पेन्शन विमा योजना ही केंद्र सरकारची असली तरीही एलआयसीच्या माध्यमातून राबवली जाते. 2014 मध्ये केंद्र सरकारने ही योजना सुरू करण्यास परवानगी दिली होती. गॅरेंटेड परतावा व एलआयसीच्या माध्यमातून दिला जाणारा परतावा यामध्ये फरक असल्यास सरकारद्वारे सबसीडीच्या माध्यमातून भरपाई दिली जाते.
वरिष्ठ पेन्शन विमा योजनेचा लाभ 60 वर्षापुढील कोणतीही व्यक्ती घेऊ शकते. एलआयसीच्या माध्यमातून तुम्ही पेन्शन विमा पॉलिसी खरेदी करू शकता. यानंतर तुम्हाला दरमहिन्याला नियमितपणे पेन्शन सुरू होईल.
वरिष्ठ पेन्शन विमा योजनेचे फायदे
पेन्शन | निवृत्तीनंतर ज्यांना नियमितपणे पेन्शन हवे आहे, ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. योजनेंतर्गत मासिक, त्रैमासिक, सहामाही अशा टप्प्याने पेन्शन दिली जाते. पेन्शनधारक स्वतः ही रक्कम कशा पद्धतीने मिळेल, हे ठरवू शकतो. |
कर्जाची सुविधा | या पेन्शन विमा योजनेवर कर्जाची सुविधा देखील उपलब्ध आहे. तुम्ही पॉलिसी खरेदी केल्यानंतर 3 वर्षांनी कर्ज काढू शकता. पॉलिसीच्या रक्कमेच्या 75 टक्के रक्कम कर्ज स्वरुपात मिळेल व यावरील व्याज हे पेन्शनमधून कापले जाईल. |
मृत्यू | पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर पॉलिसी ज्या रक्कमेला खरेदी केली आहे, ती संपूर्ण रक्कम नॉमिनीला अथवा कुटुंबाच्या सदस्यांना दिली जाईल. तसेच, या पॉलिसीचा सरेंडर कालावधी हा 15 वर्ष आहे. म्हणजेच 15 वर्षांनी पेन्शनधारक ही पॉलिसी बंद करू शकतात. तसेच, 15 वर्ष पूर्ण होण्याआधीच कोणत्याही कारणांमुळे पैशांची गरज असल्यास देखील पॉलिसी बंद करण्याची सुविधा उपलब्ध आहे. |
दरमहिन्याला मिळेल पेन्शन
वरिष्ठ पेन्शन विमा योजनेचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला नियमितपणे पेन्शनची रक्कम मिळण्याची हमी असते. तुम्ही एकरकमी पैसे भरून पॉलिसी खरेदी करू शकता. त्यानंतर दरमहिन्याला 500 रुपयांपासून ते 5 हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळेल.