• 07 Dec, 2022 10:08

Pension & Group Schemes : जाणून घ्या ग्रुप इन्शुरन्स प्लॅनमधील पेन्शन ऑप्शन्स!

Pension & Group Schemes

Pension & Group Schemes : कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर तो ह्यात असेपर्यंत नियमित पेन्शन मिळावी किंवा त्याच्या मृत्यूपश्चात त्याच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळावे. ही उद्दिष्ट्ये समोर ठेऊन ग्रुप इन्शुरन्स सुपर ॲन्युएशन स्कीमस् (Group Insurance Superannuation Schemes) तयार केल्या जातात.

“ग्रुप इन्शुरन्स प्लॅन” अर्थात “गट विमा योजना” ही सामायिक हेतूने एकत्र आलेल्या लोकांच्या समूहासाठी अतिशय कमी प्रीमियम असणाऱ्या संरक्षक विमा योजनेचा प्रकार (Types of Insurance Scheme) आहे. समान उद्दिष्ट्य असणाऱ्या कोणीही व्यक्ती किंवा संस्था आपल्या संघटनेचा भाग असणाऱ्या सदस्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी (Group Insurance Policy) खरेदी करू शकतात. ग्रुप टर्म लाईफ कव्हर प्लॅन, ग्रुप हेल्थ इन्शुरन्स प्लॅन, ग्रुप ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन, ग्रुप पर्सनल ऍक्सीडेन्ट कव्हर प्लॅन सारख्या  “ग्रुप इन्शुरन्स / हेल्थ इन्शुरन्स स्कीमस्” संघटनेच्या कर्मचारी सदस्यांना त्यांच्या सेवा कालावधीमध्ये (service tenure) मध्ये लाईफ तसेच हेल्थ इन्शुरन्सचे कव्हर देतात. तर ग्रुप पर्सनल पेन्शन स्कीम (Group Personal Pension Scheme) सारख्या पॉलिसीज् त्या कर्मचाऱ्याच्या सेवासमाप्तीनंतरच्या आयुष्यामध्ये देखील कंपनीच्या टर्म्स आणि कंडिशननुसार त्याला किंवा  त्याच्या कुटुंबाला सन्मानाने जगण्यासाठीचा आर्थिक आधार देतात.

ग्रुप सुपर ॲन्युएशन स्कीमस् (Group Superannuation Schemes) 

कोणत्याही व्यक्तीची किंवा कर्मचाऱ्याची  तो ह्यात असेपर्यंत आणि विषेशतः त्याच्या रिटायरमेंटनंतर इतर कोणावरही अवलंबून न राहता त्याची स्वतःची हक्काची रेग्युलर स्वरूपातील पेन्शन किंवा वर्षासन रक्कम (annuity) मिळत राहावी, अशीच इच्छा असते. अर्थात “नियोजनबद्ध निवृत्तीपर लाभ” (Organized Retirement Benefits) हे आज कोणत्याही क्षेत्राचा अविभाज्य भाग झाला आहे. कर्मचाऱ्याला त्याच्या निवृत्तीपश्चात तो ह्यात असेपर्यंत निश्चित स्वरूपाची नियमित पेन्शन असावी आणि / किंवा त्याच्या मृत्यूपश्चात त्याच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळावे, ही उद्दिष्ट्य समोर ठेऊन “ग्रुप सुपर ॲन्युएशन स्कीमस्” तयार केलेल्या असतात.

[media url="https://www.youtube.com/watch?v=XBsGkS7TK4U"][/media]


इन्शुरन्स कंपनी निरनिराळ्या स्वरूपामध्ये पेन्शन प्लॅन्स डिझाईन करत असते. यामध्ये आयुष्यभर निश्चित निवृत्तीवेतन देणारी “Pension for Life” असो, किंवा मृत्यूनंतर कुटुंबाला एकरकमी रक्कम परत करणारी “Pension - Return of Premium” पेन्शन योजना  असो किंवा कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या जोडीदाराला मिळणारी “Pension for Joint Life” असो. काही पेन्शन प्लॅन्समध्ये ठराविक कालावधीसाठीच पेन्शन दिली जाते. (उदाहरणार्थ – 5 वर्षे किंवा 10 वर्षे). त्या ठराविक कालावधीत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनीला उर्वरित कालावधीसाठी पेन्शनची हमी दिली जाते.

ग्रुप लाईफ इन्शुरन्सचा प्रीमियम दोन प्रकारे भरता येतो!

“ग्रुप लाईफ इन्शुरन्स”साठीचा प्रीमियम मुख्यतः दोन प्रकारे भरला जातो. ज्यापैकी "काँट्रिब्यूटरी” (Contributory) प्रकारामध्ये प्रीमियमची अंशदायी रक्कम ही कर्मचारी भरत असतो, तर उर्वरित प्रीमियम ही नियोक्ता (म्हणजे Employer) अदा करतो. म्हणजे दोघांचेही योगदान सामायिक स्वरूपाचे असते. कर्मचारी अशावेळी इन्कम टॅक्स ॲक्ट, 1961 च्या सेक्शन 80D अंतर्गत टॅक्स बेनिफिट्स (कर लाभ) मिळण्यास पात्र होतो. “नॉन-काँट्रिब्यूटरी” (Non-Contributory) स्वरूपाच्या प्रीमियम योजनेनुसार,  संघटनेमधील सर्व सदस्यांच्या  ग्रुप इन्शुरन्स किंवा ग्रुप हेल्थ इन्शुरन्ससाठीचा संपूर्ण प्रीमियम हा एम्प्लॉयरने भरलेला असतो. यांमध्ये कर्मचारी कोणतेही योगदान देत नाही.

ग्रुप लाईफ इन्शुरन्स स्कीम्समध्ये सामान्यतः वैयक्तिक कव्हरेजपेक्षा अत्यंत कमी खर्चिक प्रीमिअम असतो. आर्थिक स्रोतांच्या मर्यादेमुळे स्वतःहून वैयक्तिक योजना घेऊ शकत नसलेल्या लोकांसाठी हा किफायतशीर इन्शुरन्स समजला जातो. यामुळे कर्मचाऱ्यांना सेवेच्या काळातच नव्हे तर सेवासमाप्तीनंतरही स्वतःला किंवा काही वेळेस जोडीदारासदेखील याचे लाभ मिळतात.