Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Group Insurance Policy म्हणजे काय? तुमच्यासाठी महत्त्वाची का आहे?

What is Group Insurance

Group Insurance : वैयक्तिक इन्शुरन्स प्रमाणेच ग्रुप इन्शुरन्स देखील चालू राहणारा करार (Of a Continuing Nature) आहे. फक्त वैयक्तिक इन्शुरन्समध्ये पॉलिसीधारकाचा पॉलिसीच्या कालावधीमध्ये मृत्यू झाला तर पॉलिसी समाप्त होते. पण ग्रुप इन्शुरन्स करार मात्र गटामधील व्यक्तीच्या मृत्यूमुळे संपुष्टात न येता चालू राहतो.

What is Group Insurance : ग्रुप इन्शुरन्स प्लॅन (Group Insurance Plan) अर्थात “गट विमा योजना” ही सामायिक हेतूने एकत्र असलेल्या लोकांच्या समूहासाठी अतिशय कमी प्रीमियम असणारी संरक्षक विमा योजना (Group Insurance Scheme) असते. आपण वैयक्तिक इन्शुरन्स पॉलिसी घेतो तेव्हा एका व्यक्तीला संरक्षण मिळत असते. मात्र ग्रुप इन्शुरन्स हा एकच करार असतो, ज्यामध्ये गटामधील सर्व सदस्य समूहाला विम्याचे संरक्षण प्राप्त होत असते.

ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी कोण घेऊ शकतो?

  1. नियोक्ता (Employer) (सरकारी, निमसरकारी अथवा बिगर-सरकारी/प्रायव्हेट आस्थापना) आपल्या कर्मचाऱ्यांकरिता गट विमा घेऊ शकतो. 
  2. डॉक्टर्स, इंजिनिअर्स, अधिवक्ते (lawyers), सनदी लेखापाल (CAs), सहकारी बँकांचे सदस्य यांसारखे व्यावसायिक लोकांच्या संघटना आपल्या असोसिएशनच्या सभासदांसाठी गट विमा योजना घेऊ शकतात. 
  3. सहकारी पतसंस्था, बँका, NBFCs (नॉन-बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशस्) सारख्या संघटना त्यांच्याकडून कर्ज घेणाऱ्या कर्जदार ग्राहकांचे कर्ज संरक्षित करण्यासाठी त्यांना गट विमा योजनेचा भाग बनवतात. 
  4. केंद्र आणि राज्य सरकारे समाजातील तळागाळातील घटकांसाठी कल्याणकारी योजनांतर्गत गट विमा योजना खरेदी करू शकतात.

वैयक्तिक विम्याचे प्रपोजल हे पॉलिसी घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने इन्शुरन्स कंपनीकडे सादर करावयाचे असते. मात्र ग्रुप इन्शुरन्स करारामध्ये संपूर्ण गटाचा प्रतिनिधी (Group Representative) हा इन्शुरन्स कंपनीला प्रपोजल सादर करत असतो. म्हणजेच ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी ही एक “मास्टर पॉलिसी डॉक्युमेंट” (Master Policy Document) असते, जिच्यामध्ये त्या समूहामध्ये सम्मिलीत असलेल्या सर्व व्यक्तींची नावे असतात आणि ही पॉलिसी त्या ग्रुपच्या प्रतिनिधी व्यक्ती, एम्प्लॉयर, विश्वस्त, ट्रेंड युनिअन किंवा संघटनेला सोपविली जाते. आणि जेव्हा गटामधील एखाद्या व्यक्तीचा क्लेम इन्शुरन्स कंपनीकडे येतो, तेव्हा क्लेमची रक्कम इन्शुरन्स कंपनी त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना, कुटुंबाला किंवा पालकांना न सोपविता गटाच्या प्रतिनिधीला सोपवते. म्हणजेच ग्रुप इन्शुरन्स कराराखाली पॉलिसीचे संरक्षण प्राप्त होत असणाऱ्या व्यक्ती या कराराचा प्रत्यक्षरित्या भाग नसतात. त्यामुळे त्या व्यक्तींचे आणि इन्शुरन्स कंपनीचे एकमेकांप्रती थेट उत्तरदायित्व नसते.

WHAT IS GROUP INSURANCE

वैयक्तिक इन्शुरन्स प्रमाणेच ग्रुप इन्शुरन्स देखील चालू राहणारा करार (Of a Continuing Nature) आहे. फक्त वैयक्तिक इन्शुरन्स मध्ये पॉलिसीधारकाचा पॉलिसीच्या कालावधीमध्ये मृत्यू झाला तर पॉलिसी समाप्त होते. पण ग्रुप इन्शुरन्स करार मात्र गटामधील व्यक्तीच्या मृत्यूमुळे संपुष्टात न येता चालू राहतो. संघटनेमध्ये नवीन व्यक्ती वेळोवेळी सभासद (member) बनत राहतात. व्यक्तीचे ग्रुपच्या बाहेर पडल्यास तिचे लाईफ कव्हर संपते आणि सभासदांप्रती असणारी जोखीम देखील संपते.

गंभीर स्वरूपाचे आजार किंवा दुखापतीमुळे अपघातामुळे येणारे अपंगत्व (आंशिक किंवा पूर्ण) किंवा काही प्रसंगी मृत्यू हा वेळ सांगून येत नसतो. कायम किंवा तात्पुरत्या स्वरूपात आलेल्या शारीरिक दुरावस्थेसोबत येणारे आर्थिक संकट अशा वेळी अटळ असते.  ग्रुप लाईफ इन्शुरन्स स्कीम अथवा ग्रुप हेल्थ इन्शुरन्स प्लॅन किंवा  ग्रुप डिसॅबिलिटी इन्शुरन्स पॉलिसीचा भाग असणाऱ्या व्यक्तींना आर्थिक मदतीचे संरक्षण मिळते. प्रत्येक व्यक्तीला आपण ज्या संघटनेचा भाग आहोत, त्या संघटनेच्या सदस्यांना असणाऱ्या गट विमा संरक्षणाची माहिती असणे आवश्यक असते.

ग्रुप इन्शुरन्स पॉलिसीचा सर्वात महत्वाचा फायदा हा आहे की यामध्ये देय प्रीमियमची रक्कम अत्यन्त अल्प स्वरूपाची असते. आणि प्रीमियमची रक्कम ही संबंधित वर्षातील विमाधारकांच्या वयोगटानुसार वर्षानुवर्षे आकारली जाते. त्यामुळे संघटनेमधील सर्वच व्यक्तींना इन्शुरन्स खरेदी करणे शक्य होते. काही वेळेस काही कंपनीज् ग्रुप इन्शुरन्स प्लॅनमध्ये स्वतःहुन योगदान देतात. ग्रुप इन्शुरन्स पॉलिसीचा भाग असल्याने साहजिकच कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागते आणि कंपनीविषयी देखील विश्वासच निर्माण होतो.

नॅशनल इन्शुरन्स, दि ओरिएण्टल इन्शुरन्स, स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स, टाटा एआयजी सारखे इन्शुरर्स ग्रुप इन्शुरन्स प्लॅन देणाऱ्या काही आघाडीच्या कंपनीज् आहेत. ग्रुप इन्शुरन्स बद्दल आपण अधिक माहिती पुढील विवेचनामध्ये घेऊ.