Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pension : डिफेंस पेंशनर्सना 20 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावे लागणार अँन्युअल आयडेंटिफिकेशन

Pension

संरक्षण मंत्रालयाने (Ministry of Defence) सर्व संरक्षण निवृत्तीवेतनधारकांना मासिक पेन्शन सतत आणि वेळेवर जमा करण्यासाठी वार्षिक ओळख/जीवन प्रमाणपत्र पूर्ण करण्याची विनंती केली आहे.

संरक्षण मंत्रालयाने (Ministry of Defence) सर्व संरक्षण निवृत्तीवेतनधारकांना मासिक पेन्शन सतत आणि वेळेवर जमा करण्यासाठी वार्षिक ओळख/जीवन प्रमाणपत्र पूर्ण करण्याची विनंती केली आहे. सर्व पेन्शनधारकांनी ही प्रक्रिया 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत पूर्ण करावी. याआधीही मंत्रालयाने पेन्शनधारकांना लाइफ सर्टिफिकेशनसाठी अनेकदा माहिती दिली आहे.

संरक्षण मंत्रालयाने यापूर्वी ‘स्पर्श’ सुविधेत गेलेल्या आणि ज्यांची ओळख नोव्हेंबर 2022 मध्ये करायची होती अशा बँकांच्या पेन्शनधारकांसाठी पेन्शन पेमेंट तीन महिन्यांनी वाढवण्यास मंजुरी दिली होती. संरक्षण लेखा विभागाच्या म्हणण्यानुसार, स्पर्शद्वारे पेन्शन मिळालेल्या 3,19,366 संरक्षण निवृत्तीवेतनधारकांनी अद्याप त्यांची वार्षिक ओळख पूर्ण केलेली नाही. अशा पेन्शनधारकांनी अंतिम मुदतीपूर्वी वार्षिक ओळख किंवा जीवन पडताळणी पूर्ण करणे अनिवार्य आहे.

वार्षिक ओळख/जीवन पडताळणी अशी करा

  • निवृत्तीवेतनधारक https://sparsh.defencepension.gov.in/ वर लॉग इन करून वार्षिक ओळख/जीवन पडताळणी पूर्ण करू शकतात.
  • अधिकृत स्वाक्षरीने रीतसर स्वाक्षरी केलेले मॅन्युअल लाइफ सर्टिफिकेट (MLC) डाउनलोड आणि अपलोड करा.
  • आधार आधारित डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (DLC) निवडा.
  • निवृत्तीवेतनधारक त्यांची वार्षिक ओळख किंवा जीवन प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी जवळच्या डीपीडीओ (DPDO) किंवा संरक्षण लेखा विभाग सेवा केंद्राला भेट देऊ शकतात. याशिवाय ते एसबीआय, पीएनबी, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँकेने उभारलेल्या सेवा केंद्रालाही भेट देऊ शकतात.
  • अँड्रॉइड वापरकर्ते डिजिटल जीवन प्रमाण ऑनलाइन/जीवन प्रमाण फेस अॅपद्वारे करु शकतात.

निवृत्ती वेतनासाठी होणारा खर्च

अर्थ मंत्रालयाने संरक्षण मंत्रालयाला एकूण 5.93 लाख कोटी रुपयांचे बजेट दिले आहे, जे एकूण बजेटच्या 13.18 टक्के आहे. यामध्ये संरक्षण निवृत्ती वेतनासाठी 1.38 लाख कोटी रुपयांचाही समावेश आहे. या रकमेतून माजी सैनिकांचे (संरक्षण निवृत्तीवेतनधारक) निवृत्ती वेतन दिले जाईल. तर, माजी सैनिकांच्या वैद्यकीय सेवेचा पल्ला वाढवण्यासाठी, माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ECHS) साठी संरक्षण बजेटमध्ये 52 टक्के वाढ करण्यात आली आहे.