Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Football Legend Pele Death: वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; मागे सोडली इतकी संपत्ती

Football Legend Pele Death

Image Source : www.twitter.com/

Football Legend Pele Death: पेले यांनी त्यांच्या कारकीर्दीत ब्राझीलच्या संघाला तीन वेळा वर्ल्ड कप मिळवून दिला. तर त्यांनी त्यांच्या वैयक्तिक कारकीर्दीत 1297 गोल केले आहेत. ते जगातील सर्वाधिक मानधन घेणारे खेळाडू होते.

Football Legend Pele Death: जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या पेले यांनी वयाच्या 82व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. पेले यांची मुलगी केली नासिमेंटो हिने इन्स्टाग्रामद्वारे ही बातमी जगासमोर आणली. पेले यांनी त्यांच्या कारकीर्दीत ब्राझीलच्या संघाला तीन वेळा वर्ल्ड कप मिळवून दिला. तर त्यांनी त्यांच्या वैयक्तिक कारकीर्दीत 1297 गोल केले आहेत.

फुटबॉलपट्टू पेले यांची एकूण संपत्ती

Edudwar या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, पेले यांची 2022 या वर्षातील एकूण संपत्ती 100 मिलिअन डॉलरहून अधिक होती. पेले यांनी त्यांच्या कारकार्दीत फुटबॉल या खेळामधून भरपूर पैसे मिळवले होते. त्यांनी फुटबॉलव्यतिरिक्त इतर माध्यमातूनही पैसे मिळवले होते. पेले हे जगभरात सर्वाधिक मानधन घेणारे आणि सर्वांत यशस्वी असे अथलेट होते.

पेले यांची 2018 ते 2022 या वर्षांतील एकूण संपत्ती  

वर्ष

एकूण संपत्ती

2022100 मिलिअन डॉलर
202195 मिलिअन डॉलर
202090 मिलिअन डॉलर
201985 मिलिअन डॉलर
201875 मिलिअन डॉलर
स्त्रोत: https://www.edudwar.com/pele-net-worth/

वयाच्या 17व्या वर्षी देशासाठी विश्वचषक जिंकला

1958 मध्ये फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये ब्राझील पहिल्यांदा विजय मिळवला होता आणि या विजयाचा शिल्पकार, चॅम्पियन ठरला होता 17 वर्षीय पेले. त्याने या वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त खेळ खेळून ब्राझीलला प्रथमच विजय मिळवून दिला होता. पेलेने सेमीफायनलमध्ये फ्रान्सबरोबरच्या सामन्यात गोलची हॅटट्रिक मारली होती. त्यानंतर स्वीडनसोबतच्या फायनल मॅचमध्येही त्याने दोन गोल केले होते. त्या वर्षीच्या वर्ल्ड कपमध्ये त्याने एकूण 6 गोल केले होते. यासाठी त्याला त्यावर्षीचा बेस्ट यंग स्पोर्ट्समनचा (Best Young Sportman) किताब दिला होता. त्यानंतर पेलेने 1962 आणि 1970 मध्ये ब्राझीलसाठी पुन्हा वर्ल्ड कप जिंकून दिला होता.

पेले यांचे आता नेमके वय काय होते?

पेले यांचे वय 82 वर्षे होते.

पेले यांचे पूर्ण नाव काय होते?

पेले यांचे मूळ नाव एडसन अरांतेस दो नॅसिमेंटो (Edson Arantes do Nascimento) हे आहे. पेले हे त्यांचे निकनेम आहे.

पेले यांची जन्मतारीख काय आहे?

पेले यांची जन्मदिनांक 23 ऑक्टोबर, 1940 ही असून त्यांचा जन्म ब्राझीलमध्ये झाला होता.

पेले यांचे प्रत्येक महिन्याचे उत्पन्न काय होते?

पेले हे प्रत्येक महिन्याला किमान 1 मिलिअन डॉलरचे उत्पन्न मिळवत होते.

पेले यांची 2022 मधील एकूण संपत्ती किती होती?

2022 मध्ये पेले यांची एकूण संपत्ती 100 मिलिअन डॉलरहून अधिक असल्याचे सांगितले जाते.

पेले यांचे कमाल वार्षिक उत्पन्न काय होते?

पेले यांचे कमाल वार्षिक उत्पन्न 8 मिलिअन डॉलरहून अधिक होते.