पेटीएम पेमेंटस बँकेने आपल्या UPI Lite अॅपच्या माध्यमातून 4.3 दशलक्ष नवीन ग्राहक मागील आर्थिक वर्षात जोडले आहेत. तसंच पेटीएम सुपर अॅप द्वारे आतापर्यंत 1 कोटींहून अधिक व्यवहार केले आहेत.आम्ही अल्पावधीतच 4.3 दशलक्ष पेटीएम युपीआय लाईट यूजर्स आणि 10 दशलक्ष रुपयांचा व्यवहारांचा टप्पा गाठला आहे. तसेच यूजर्ससाठी दैनंदिन पेमेंट त्रासमुक्त, जलद आणि अखंडित केले आहे. Paytm UPI Lite पेटीएम पेमेंट्स बँकेच्या सुरक्षा आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने सुरक्षितपणे चालवलं जातं,' असं पेटीएम पेमेंट्स बँकेच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.
Paytm UPI Lite ची काय आहे वैशिष्ट्ये
सध्या सुमारे 10 बँका Paytm UPI Lite ला जोडल्या गेल्या आहेत. त्यामध्ये टीएम पेमेंट बँक, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, इंडियन बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक या बँकांचा समावेश आहे. यापूढे इतरही अनेक बँका एटीएम लाईट पेमेंट्स सोबत जुळणार असल्याची माहिती कंपणीने दिली. आतापर्यंत उत्तम आणि विश्वासार्ह असा अनुभव यूजर्सचा वापरकर्त्यांच्या बाबतीत राहीला आहे. याव्यतिरिक्त,पेटीएम यूपीआय लाइट पेटीएमचे व्यवहार 3-स्तरीय बँक-ग्रेड सुरक्षेद्वारे सुरक्षित आहे.
कुठे-कुठे होतो वापर
पेटीएम यूपीआय लाइटचा वापर कोणत्याही UPI, QR कोडवर सुपरफास्ट UPI पेमेंट करण्यासाठी, कोणत्याही मोबाइल नंबरवर पैसे पाठवण्यासाठी किंवा सेल्फ ट्रान्सफर पर्यायाद्वारे पेटीएम सुपर अॅपशी लिंक केलेल्या स्वत:च्या बँक खात्यांमध्ये रक्कम हस्तांतरित करण्यासाठी केला जाऊ शकतो.
कंपनीने दिल्या ग्राहकांनी खास ऑफर
पेटीएम अॅपवर ग्राहकांसाठी काही विशेष ऑफर सुरु करण्यात आली आहे. या आयपीएल सीझनमध्ये Paytm UPI Lite पेटीएम यूपीआय ड्रीम11, एमपीएल, माय11 सर्कल, फर्स्ट गेम्स, विन्झो आणि मायटीम11 यासह टॉप फॅन्टसी गेमिंग अॅप्ससह आकर्षक कॅशबॅक ऑफर चालवत आहे. वापरकर्ते पेटीएम यूपीआय लाइट वापरू शकतात आणि त्यांच्या फॅन्टसी क्रिकेट टीम्स बनवण्यासाठी या प्रत्येक अॅपमध्ये पैसे जमा करुन 300 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवू शकतात. याव्यतिरिक्त, आयपीएल 2023 सीझनमध्ये, पेटीएमने पेटीएम क्रिकेट लीग नावाच्या अॅपवर एक आकर्षक गेम देखील लॉन्च केला आहे. या गेममध्ये, वापरकर्ते त्यांच्या सर्व पेमेंट गरजांसाठी Paytm वापरून धावा काढू शकतात आणि iPhone 14 ते 7,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक आणि अनेक आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळवू शकतात.