Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Paytm : पेटीएम अॅपद्वारे भरा फ्लॅटचा मेंटनन्स

Paytm

फ्लॅटचा मेंटनन्स असो की सोसायटीमधील इतर चार्जेस तुम्ही पेटीएम अँपच्या (Paytm App) माध्यमातून शुल्क भरू शकता. ते कसे भरायचे ते आज पाहूया.

नोएडा, दिल्ली, मुंबई, लखनौ, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू आणि इतर मोठ्या शहरांतील रहिवासी आता पेटीएम अॅपवर (Paytm App) भाड्याशिवाय त्यांच्या अपार्टमेंटचे शुल्क भरू शकतात. पेटीएम ब्रँडची मालकी असलेल्या One97 कम्युनिकेशन्स लिमिटेड (OCL) ने देशभरात 2,800 हून अधिक निवासी सोसायट्या जोडल्या आहेत आणि या सोसायट्यांमधील रहिवासी आता प्रीपेड मीटर, मेंटनन्स चार्जेस, क्लबहाऊस शुल्क, कचरा संकलन शुल्क आणि इतर गोष्टींचे चार्जेस पेटीएम अॅपद्वारे शुल्क भरू शकतात.

अपार्टमेंट पेमेंट फिचर

पेटीएम अॅपवरील अपार्टमेंट पेमेंट वैशिष्ट्याद्वारे, वापरकर्ते विविध अपार्टमेंट शुल्क भरण्यासाठी पेटीएम वॉलेट, पेटीएम यूपीआय, नेटबँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड यासारख्या एकापेक्षा अधिक पेमेंट पद्धती वापरू शकतात. पेटीएम अॅपसह, वापरकर्त्यांना रिकर्रिंग अपार्टमेंट पेमेंटसाठी वेळोवेळी सूचना देखील मिळतात आणि यशस्वी पेमेंटवर ऑफर देखील मिळवू शकतात. जर वापरकर्त्यांना त्यांची सोसायटी अॅपवर सूचीबद्ध आढळली नाही, तर ते 'रेफर अपार्टमेंट' वर क्लिक करू शकतात आणि हाउसिंग सोसायटीचे तपशील भरू शकतात.

पेटीएमवर अपार्टमेंटचे शुल्क कसे भरावे?

  • सर्वप्रथम तुमचे पेटीएम अॅप उघडा आणि 'रिचार्ज आणि बिल पेमेंट्स' वर जा
  • 'Recharges and Bill Payments' अंतर्गत, 'View More' वर टॅप करा.
  • आता 'Pay your Home Bills' वर खाली स्क्रोल करा
  • आता 'Apartments' निवडा आणि तपशील प्रविष्ट करा.
  • तपशीलांमध्ये शहराचे नाव, अपार्टमेंट, युटीलिटी टाईप आणि अपार्टमेंट क्रमांक प्रविष्ट करा
  • ग्राहक तपशील व्हेरिफाय करा आणि रक्कम प्रविष्ट करा आणि आता 'Proceed' वर क्लिक करा
  • आता पेमेंट पर्याय निवडा - पेटीएम वॉलेट, पेटीएम यूपीआय, नेटबँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड
  • यानंतर यशस्वी पेमेंटनंतर ऑर्डर समरी जनरेट होईल.