Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SIP Calculator: दरमहा एसआयपीतून 10 हजार भरा आणि 1 कोटी मिळवा

Mutual Fund Investment

SIP Calculator: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याच्या अनेक योजना आहेत. या योजनांमधील गुंतवणुकीतून दीर्घकालीन गुंतवणुकीवर वर्षाला सरासरी 12 टक्के परतावा मिळू शकतो. हा अंदाज मागील काही वर्षांमध्ये म्युच्युअल फंडांनी दिलेल्या परताव्यावर वर्तवला जातो. पण हा परतावा निश्चित 12 टक्के मिळेलच याची शाश्वती देता येत नाही.

SIP Calculator:  शेअर मार्केटमधील चढ-उतार, वाढती महागाई आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या आर्थिक मंदीच्या वाऱ्यातही गुंतवणूकदारांची म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीची क्रेझ टिकून आहे. जानेवारी 2023 मध्ये एसआयपीच्या माध्यतून सुमारे 13,856 कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक म्युच्युअल फंडमध्ये झाली. सर्वसाधारणपणे गुंतवणूकदारांकडून एसआयपी (Systematic Investment Plan-SIP) या गुंतवणुकीच्या प्रकाराला पसंती मिळत असल्याचे दिसून येते.

SIP गुंतवणुकीचा साधा सोपा पर्याय

एसआयपी हा नियमित आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीचा प्रकार आहे. SIP द्वारे गुंतवणूकदार कमीतकमी बचत करून दीर्घकालावधीसाठी मोठी गुंतवणूक करू शकतो. तसेच यातून गुंतवणूकदाराला इक्विटीसारखा परतावा मिळवता येऊ शकतो. एसआयपीच्या माध्यमातून किरकोळ गुंतवणूकदार म्युच्युअल फंडमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत.

वर्षाला सरासरी 12 टक्के परतावा मिळू शकतो

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याच्या अनेक योजना आहेत. या योजनांमधील गुंतवणुकीतून दीर्घकालीन गुंतवणुकीवर वर्षाला सरासरी 12 टक्के परतावा मिळू शकतो. हा अंदाज मागील काही वर्षांमध्ये म्युच्युअल फंडांनी दिलेल्या परताव्यावर वर्तवला जातो. पण हा परतावा निश्चित 12 टक्के मिळेलच याची शाश्वती देता येत नाही. हा परतावा पूर्णत: शेअर मार्केटमधील चढ-उतारांवर अवलंबून असतो.

Benefits of SIP

एसआयपीद्वारे 6.21 कोटी गुंतवणूकदारांची गुंतवणूक

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (Association of Mutual Funds in India-AMFI)च्या आकडेवारीनुसार जानेवारी 2023 मध्ये गुंतवणूकदारांनी एसआयपीच्या माध्यमातून विक्रमी अशी 13,856 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच ज्या गुंतवणूकदारांनी एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक सुरू केली आहे; अशा खातेदारांची संख्या 6.21 कोटी इतकी झाली आहे. एम्फीच्या या आकडेवारीवरून असे दिसून येते की, गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास कायम आहे.

एसआयपीतून असे मिळवा 1 कोटी रुपये

एसआयपी ही गुंतवणुकीची अशी पद्धत आहे. ज्याद्वारे तुमच्या गुंतवणुकीला आर्थिक शिस्त लागते. तसेच एसआयपी दीर्घकाळाकरीता सुरू ठेवल्यास त्यातून मिळणारा परतावा हा खूपच अधिक असतो. उदाहरणार्थ, तुम्ही नोकरीच्या पहिल्या वर्षापासून म्हणजे वयाच्या 25 व्या वर्षापासून प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपयांची एसआयपी सुरू केली आणि ही एसआयपी वयाच्या 45 व्या वर्षापर्यंत सुरू ठेवली. तर तुम्हाला प्रत्येक महिन्यातील 10 हजारांच्या एसआयपीवर 45 व्या वर्षी 1 कोटी रुपयांचा फंड तयार होऊ शकतो. तुम्ही 20 वर्षांत एसआयपीद्वारे 24 लाख रुपयांची गुंतवणूक करता. त्यावर तुम्हाला 12 टक्क्यांच्या हिशोबाने अंदाजित 75 लाखांपर्यंत परतावा मिळेल.म्हणजेच 20 वर्षांत तुम्ही एसआयपीद्वारे सहज 1 कोटी रुपये मिळवू शकता.

sip return calculator
Source: https://sipcalculator.in/

पण म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही शेअर मार्केटमधील चढ-उतारांवर अवलंबून असते. त्यामुळे यातून मिळणाऱ्या गुंतवणुकीची शाश्वती देता येत नाही. गुंतवणूकदाराने आपली उत्पन्न, गरज आणि जोखीमीच्या आधारावर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी, असा सल्ला नेहमी तज्ज्ञ देतात. पण एसआयपी ही एक गुंतवणुकीची सर्वमान्य किल्ली समजली जाते. कारण यामध्ये कमीतकमी रुपयांमध्ये गुंतवणूक सुरू करता येते. जसे की म्युच्युअल फंडमध्ये अगदी 100 रुपयांपासून गुंतवणूक करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

एसआयपीमध्ये सरासरीकरणाचा लाभ

एसआयपी पद्धतीद्वारे केलेल्या गुंतवणुकीतून सरासरीकरणाचा लाभ मिळतो. कसा ते आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ. 10 रुपये दर्शनी मूल्याचे 10 युनिट्स प्रति युनिट 50 रुपये दराने विशिष्ट तारखेस एका महिन्यात खरेदी केले. तर त्याच तारखेस दुसऱ्या महिन्यात 10 युनिट्सची प्रति युनिट 52 रुपयांस खरेदी केली, तर एका युनिटची सरासरी किंमत 51 रुपये आली. तसेच 52 रुपयांस जेवढी युनिट्सची संख्या खरेदी झाली होती, त्यापेक्षा अधिक युनिट्सची खरेदी 50 रुपये निव्वळ मालमत्ता मूल्यास झाली. दोन महिन्यांत एकत्रित युनिट्सची संख्या ही वाढली आणि सरासरी किंमतसुद्धा कमी आली.

म्युच्युअल फंड गुंतवणुकीत नियोजनबद्ध गुंतवणूक योजनेला अर्थात एसआयपीला खूप महत्त्व आहे. पण प्रत्येक एसआयपी 100 टक्के नफ्याची हमी देत नाही. पण प्रदीर्घ काळासाठी गुंतवणूक केल्यास नुकसान होण्यापासून किमान संरक्षण मिळवता येऊ शकते.

डिसक्लेमर: शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. ‘महामनी’ वेबपोर्टल शेअर्स, म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)