Pathan Movie: पठाण चित्रपटाची धूम संपूर्ण देशभरात दिसत आहे. शाहरूख खानच्या (Shahrukh Khan) या चित्रपटाची अॅडव्हाॅन्स बुकिंगच 50 कोटीच्या घरात पोहोचली आहे. विशेष म्हणजे पठाण चित्रपटाच्या निमित्ताने बंद पडलेली 25 थिएटर पुन्हा उघडणार आहेत तर हा चित्रपट पहिल्याच आठवडयात 200 कोटींचा गल्ला पार करणार असल्याचे सांगितले जात आहे. याविषयी अधिक जाणून घेवुयात.
बंद पडलेली थिएटर्स पुन्हा सुरू होणार (Closed Theaters will Reopen)
‘पठाण’च्या अॅडव्हाॅन्स बुकिंगने ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे रेकॉर्ड देखील मोडला आहे. कोरोना महामारीमुळे काही सिंगल थिएटर्स बंद पडली होती, मात्र पठाणच्या क्रेझमुळे ही चित्रपटगृहे पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे पठाण चित्रपटामुळे बंद पडलेल्या थिएटर्सला सुगीचे दिवस आले म्हणण्यास हरकत नाही.
चित्रपट विश्लेषक तरण आदर्श (Film Analyst Taran Adarsh)
चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्वीटव्दारे ही माहिती दिली. ते या पोस्टमध्ये लिहितात की, भारत देशात 25 थिएटर बंद पडले होते. पण पठाण चित्रपटाची क्रेझ पाहता, हे सिंगल स्क्रीन असणारे थिएटर्स पुन्हा सुरू होणार आहेत. पठाणमुळे सिंगल स्क्रीन असणाऱ्या थिएटर्सला एक आशेचा किरण दिसला आहे.
200 कोटींचा गल्ला जमविणार (Film analyst Taran Adarsh)
पठाण चित्रपटासाठी चाहते संपूर्ण थिएटरच बुक करीत आहे. तर दुसरीकडे अॅडव्हान्स बुकिंगदेखील जोरात होत असल्याचे दिसत आहे. एक अंदाज आहे की, अॅडव्हान्स बुकिंग ही 50 कोटीपर्यंत पोहोचली आहेत. तर बंद पडलेली 25 थिएटर्सदेखील पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे हे चित्र पाहता पठाण हा चित्रपट पहिल्याच आठवडयात 200 कोटींचा गल्ला पार करेल, असा अंदाज चित्रपट विश्लेषकांनी सांगितला आहे.