Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pathan Movie Ticket Price will be Reduced: पठाण चित्रपटाची तिकिटे होणार स्वस्त, शाहरूख खान देणार प्रेक्षकांना सुखद धक्का

Pathan Movie Ticket Price will be Reduced

Image Source : http://www.koimoi.com/

Pathan Movie Tickets: देशासहित जगभरात 'पठाण' चित्रपटाची तुफान क्रेज आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षकांचा उत्साह पाहता, पठाण चित्रपटाचे तिकिट दर स्वस्त करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Pathan Movie: शाहरूख खान (Shahrukh Khan), दिपिका पदुकोन (Deepika Padukone) व जाॅन अब्राहिम (John Abraham) या दिग्गज कलाकारांचा ‘पठाण’ (Pathan) चित्रपट सध्या थिएटरमध्ये फुल हाऊस चालला आहे. सोमवारी चित्रपट प्रदर्शनानंतर सहावा दिवस होता, तरी प्रत्येक दिवशी या चित्रपटाची  नाॅन स्टाॅप कोटींच्या घराण्यात  कमाई होत आहे. त्यामुळे बाॅलिवुडचा बादशाह शाहरूख खानच्या पठाण टीमकडून प्रेक्षकांना सुखद धक्का देत, पठाण चित्रपटाच्या तिकिटाचा दर कमी करणार असल्याचे सांगितले जात आहे.

पठाण तिकिटाचा दर का होणार कमी? (Why will the Price of Pathan Ticket be Reduced)

शाहरूख खानच्या पठाण चित्रपट ब्लाॅक ब्लस्टर ठरला आहे. दिवसेंदिवस हा चित्रपट एकापाठोपाठ एक नवीन रेकाॅर्ड तयार करीत आहे. या चित्रपटाच्या तुफान क्रेजने पठाण टीम व निर्मातेदेखील खूप आनंदी आहेत. जर या चित्रपटाने बजेटच्या वर कमाई केली की, या चित्रपटाच्या तिकिटांच्या किंमतीत जवळपास 25 टक्क्यांनी घट होणार असल्याचे सांगितले जात आहे. एकदा चित्रपटाने बजेटच्या वर रेकाॅर्डब्रेक कमाई केली की, निर्मात्यांना प्रेक्षक थिएटरपर्यंत पोहोचण्याचा वेग कायम ठेवायचा आहे. त्यामुळे पठाण चित्रपट तिकिटांचे दर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पठाण बाॅक्स ऑफिस कलेक्शन (Pathan Box Office Collection)

पठाण चित्रपटाने संपूर्ण जगभरात  बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने अॅडव्हाॅन्स बुकिंगव्दारे 50 कोटींचा टप्पा पार केला होता. आता हा चित्रपट प्रत्येक दिवशी कोटीच्या घरात कमाई करीत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने जागतिक पातळीवर 500 कोटींचा गल्ला जमविला आहे, तर देशांतर्गत  300 कोटींचा टप्पा पार केला आहे. 

सोशलमिडीयावर पठाणचा बोलबाला (Pathan craze on Social Media) 

सोशलमिडीयावर तर पठाण चित्रपटातील गाण्यांनी धुमाकूळ घातला आहे. इंस्टाग्रामवर लहानांपासून ते मोठयांपर्यंत सर्वजण ‘झूमे है पठाण’ या गाण्यांवर रील्स करताना दिसत आहे. तर दिपिकाच्या गाण्यावरदेखील तरूणाई ठेका धरताना दिसत आहे. तसेच पठाणचे मिम्सदेखील सोशलमिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. या चित्रपटाचे जगभरातील प्रेक्षकांना वेड लागले आहे. प्रत्येक दिवशी हा चित्रपट कोटी रूपयांची कमाई करीत आहे.