पॅटोगोनिआचे संस्थापक युवॉन चोईनार्ड (Yvon Chouinard) यांनी कंपनीतून मिळणारा नफा हवामान बदलाच्या विरोधातील लढाईसाठी देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांचे कौतुकाबरोबरच टीका होऊ लागली आहे. काही जणांच्या मते, चोईनार्ड यांनी उचलेले पाऊल कौतुकास्पद असल्याचे म्हटले; तर काही जणांनी याला टॅक्स टाळण्याचा नवीन मार्ग म्हणून अवहेलना केली.
पॅटोगोनिआचे संस्थापक युवॉन चोईनार्ड (Yvon Chouinard) यांनी मागील आठवड्यात जाहीर केले की, ते आणि त्यांचे कुटुंबातील सदस्य इथून पुढे कंपनीतून मिळणारा नफा स्वत:साठी न वापरता तो जागतिक वातावरणातील बदलांविरोधात लढण्यासाठी वापरला जाईल, असे युवॉन यांनी स्पष्ट केले. पॅटोगिनिआच्या या भूमिकेवर शंका व्यक्त करत अनेक कायदेशीर तज्ज्ञांनी, हा टॅक्स वाचवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले.
पॅटोगोनिआ काय आहे?
पॅटोगोनिआ (Patagonia) हा अमेरिकेतील (वेन्तुरा, कॅलिफोर्निया) तयार कपडे विकणारा स्पोर्ट्स ब्रॅण्ड आहे; युवॉन चोईनार्ड (Yvon Chouinard) यांनी 1973 मध्ये या कंपनीची स्थापना केली होती. पॅटोगोनिआचे जगभरात स्टोअर्स असून 16 देशांमध्ये फॅक्टरीज् आहेत. आऊटडोअर क्लोथस् हे पॅटोगोनियाचे मुख्य प्रोडक्टस् असून कंपनीचा 2022 मधील एकूण रिव्हेन्यू 1.5 बिलिअन डॉलर इतका आहे.
स्वत: चोईनार्ड, त्यांची पत्नी आणि दोन मुलं या सगळ्यांनी कंपनीतील आपल्या मालकीच्या वाट्यातील 2 टक्के शेअर्स हे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पॅटोगोनिआ पर्पोज ट्रस्टमध्ये (Patagonia Purpose Trust) वळवले आहेत, अशी माहिती न्यूयॉर्क टाईम्स या वृत्तपत्राने दिली. तर उर्वरित कंपनीचे शेअर्स हे नव्याने स्थापन करण्यात आलेली सामाजिक संस्था होल्डफास्ट कलेक्टीव्ह (Holdfast Collective) संस्थेला ट्रान्सफर करण्यात आले. ही संस्था सामाजिक कार्यासाठी वर्षाला सुमारे 100 मिलिअन डॉलर उभे करते.
पॅटोगोनिआ पर्पोज ट्रस्ट (Patagonia Purpose Trust) ही संस्था Patagonia कंपनीचा नियमित व्यवहार आणि संस्थेने स्वीकारलेले मिशन सुद्धा पाहणार आहे. या कुटुंबाने सामाजिक कामासाठी दिलेली मदत ही अंदाजे 3 बिलिअन डॉलर इतकी आहे; आणि ती करकपातीसाठी पात्र नव्हती. तरीही त्या चोईनार्ड कुटुंबाने त्यावर 17.5 मिलिअन डॉलर टॅक्स भरला.
समाजातील काही घटकांकडून चोईनार्ड यांच्या या कृतीला नाटकीपणा व टॅक्स वाचवण्यासाठी केलेली युक्ती म्हणून हिणवले जात आहे. तर काही घटक असं मत मांडतात की, स्वत: युवॉन चोईनार्ड (Yvon Chouinard), चोईनार्ड फॅमिली आणि होल्डफास्ट कलेक्टीव्ह हे कुठल्याही राजकीय पक्षाचं विस्तारीत स्वरूप नाहीये. तर चोईनार्ड हे असे कुटुंब आहे; जे एका सामाजिक आणि जागतिक समस्येविरोधात नेटाने लढण्याचा प्रयत्न करत आहे, अशी सकारात्मक भावनाही चोईनार्ड कुटुंबियांबाबत समाजातून व्यक्त केली जात आहे.