Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पालकांना स्कूल बस दरवाढीचा फटका!

पालकांना स्कूल बस दरवाढीचा फटका!

स्कूल बसच्या दरात 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय स्कूल बस ओनर्स असोसिएशनने घेतला आहे.

आजपासून (सोमवारपासून) राज्यातील अनेक शाळा सुरु झाल्या आहेत. पण शाळेच्या पहिल्याच दिवशी पालकांच्या खिशावर ताण येणार आहे. कारण पहिल्याच दिवशी स्कूल बसच्या दरात 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय स्कूल बस ओनर्स असोसिएशनने घेतला आहे. वाढत्या महागाईचा परिणाम शिक्षणक्षेत्रांवरही होत आहे. शाळेचा गणवेश, अभ्यासाचे साहित्य यांच्या किमतीही वाढत आहेत. त्यात हि बसची दरवाढझाल्याने पालकांना आपला खिसा रिता करावा लागणार आहे. 

किती दरवाढ होणार?

अनेक मुले घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी स्कूल बसेसचाच वापर करतात. पण या स्कूल बसेसच्या दरात शाळेच्या पहिल्याच दिवसापासून मोठी वाढ करण्यात आली आहे. सोमवारपासूनच स्कूल बस संघटनेने स्कूल बसच्या दरात 20 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याआधी साधारणतः 1800 रुपये एवढा दार होता. त्यात आता आणखी 20 टक्केची वाढ होणार आहे. 20 टक्के म्हणजे साधारण 400 ते 500 रुपयांची दरवाढ केली जाणार आहे. संघटनेकडून 30 टक्के दरवाढीची मागणी करण्यात येत होती. मात्र पालकांच्या अडचणी लक्षात घेता 20 टक्के दरवाढ केली असल्याचे संघाकडून सांगण्यात आले आहे. देशात इंधनाच्या दरांमुळे महागाई वाढली आहे. त्याचा फटका स्कूल बस चालक–मालकांनाही बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता शाळेच्या पहिल्या दिवसापासून स्कूल बसच्या दरात 20 टक्के वाढ करण्यात आली आहे.

स्कुल बसची दरवाढ का झाली? 

स्कुल बसच्या दरवाढीचे मुख्य कारण जरी इंधनाची झालेली दरवाढ असले तरी दोन वर्षांपासून कोविडमुळे विद्यार्थी घरुनच शिक्षण घेत होते. त्यावेळी शाळेसोबतच स्कुल बसही बंद होत्या. त्यामुळे स्कुलबस चालक आणि मालकांचेही नुकसान झाले आहे. बस अनेक काळ बंद असल्याने त्यांच्या दुरुस्तीचे कामही करावे लागणार आहे. या सर्व बाबींचा विचार करून संघटनेने दरवाढ करण्याचे निश्चित केले आहे. वाढत्या महागाईत पालकांना आणखी एक दरवाढीला सामोरे जावे लागतं आहे.