Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Parag Parikh Tax Saver Fund: गुंतवणूक अन् कर बचत, जाणून घ्या पराग पारिख टॅक्स सेव्हर फंडाची कामगिरी

Parag Parikh Tax Saver Fund

Parag Parikh Tax Saver Fund: संपत्ती निर्मितीबरोबच गुंतवणूकदारांना कर बचतीला लाभ देणाऱ्या ELSS म्युच्युअल फंड योजना बाजारात उपलब्ध आहेत. या योजनांमधील गुंतवणूक आयकर कलम 80 सी नुसार कर वजावटीस पात्र ठरते. या श्रेणीत पराग पारिख टॅक्स सेव्हर फंड चांगला पर्याय ठरू शकतो.

पराग पारिख टॅक्स सेव्हर फंडाने सुरुवातीपासून इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS Mutual Fund Scheme) या म्युच्युअल फंडांच्या श्रेणीत जबरदस्त कामगिरी केली आहे. या फंड योजनेने गुंतवणूकदारांना कर लाभ दिलाच परंतु सुरुवातीपासून वर्षाला सरासरी 23.86% रिटर्न दिला आहे.

डिसेंबर महिना संपत आला कि गुंतवणूकदार कर बचतीच्या गुंतवणूक पर्यायांकडे वळतात. गुंतवणूक करताना कर बचतीचा लाभ मिळावा याकडे गुंतवणूकदारांचा कल असतो. आयकल कलम 80 सी नुसार वैयक्तिक करदाता, एचयूएफ यांना ईएलएसएस योजनांमध्ये एका वर्षात केलेल्या गुंतवणुकीपैकी 1.5 लाख रुपयांची कर वजावट मिळते. शिवाय ईएलएसएस योजनांचा किमान गुंतवणूक कालावधी (लॉक इन पिरिएड) तीन वर्ष आहे. कर बचतीचा लाभ देणाऱ्या पीपीएफ, एनपीएस किंवा टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिट योजनांमध्ये किमान गुंतवणूक कालावधी हा 5 वर्ष ते 15 वर्ष इतका आहे.

अलिकडच्या काळात इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्किम या म्युच्युअल फंडांच्या योजना कर बचतीच्या दृष्टीने लोकप्रिय झाल्या आहेत. ईएलएसएस योजनांमधील बहुतांश फंडांनी सुरुवातीपासून वर्षाकाठी सरासरी 17% परतावा दिला आहे. यात पराग पारिख टॅक्स सेव्हर फंड आघाडीवर आहे.

पराग पारिख टॅक्स सेव्हर फंडाच्या डायरेक्ट प्लॅनमधून गुंतवणूकदारांना सुरुवातीपासून वर्षाला सरासरी 23.86% परतावा मिळाला आहे. या योजनेच्या रेग्युलर प्लॅनने गुंतवणूकदारांना 22.30% रिटर्न दिला. ही योजना निफ्टी 500 टीआरआय या निर्देशांकाला ट्रॅक करते. पराग पारिख टॅक्स सेव्हर फंडाच्या रेग्युलर प्लॅनची एनएव्ही 27 डिसेंबर 2022 अखेर 19.81 रुपये आहे. तीन वर्षात या फंडाने सरासरी 22.34% रिटर्न दिला आहे.

आकडेवारी पाहिली तर पराग पारिख टॅक्स सेव्हर फंड 24 जुलै 2019 रोजी सुरु झाला. या फंडाची एकूण मालमत्ता 848 कोटी इतकी आहे. एक्सपेन्स रेशो 2.23% आहे. या फंडाने बजाज होल्डिंग्ज, एचडीएफसी लिमिटेड, आयटीसी लिमिटेड, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. गुंतवणुकीतून जास्त परतावा मिळावा म्हणून हा फंड जोखमीशी कोणतीही तडजोड करत नाही.