Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pan Card Update: 13 कोटी लोकांचे पॅनकार्ड होणार रद्द; यात तुमचे कार्ड तर नाही ना! चेक करून घ्या

Pan Card-Aadhar Link Last Date 30 June

Pan Card Update: केंद्र सरकारकडून आधारकार्ड-पॅनकार्ड लिंक करण्याबाबत सातत्याने नागरिकांना माहिती दिली जात आहे. पण अजूनही 13 कोटी पॅनकार्डधारकांनी ते आधारकार्डला लिंक केलेले नाही. त्यांचे पॅनकार्ड रद्द केले जाणार आहे.

Pan Card-Aadhar Link: केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी देशातील प्रत्येक नागरिकाला एक विशिष्ट ओळख क्रमांक (Unique Identification Number) देण्यासाठी आधारकार्डची (Aadhar Card) सुरूवात केली होती. हे आधारकार्ड सरकारने नंतर प्रत्येक योजनेसोबत जोडले. सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधारकार्ड बंधनकारक आहे आणि आता सरकारने या आधारकार्डला पॅनकार्ड लिंक करण्याबाबत सांगितले आहे. ज्यांनी अजूनपर्यंत पॅनकार्ड (Pan Card) आधारला लिंक केले नाही. त्या पॅनकार्डधारकांचे पॅनकार्ड रद्द केले जाणार आहे.

केंद्र सरकारकडून आधार-पॅन लिंकबाबत वारंवार सूचना

केंद्र सरकारकडून आधारकार्ड-पॅनकार्ड लिंक करण्याबाबत सातत्याने नागरिकांना माहिती दिली जात आहे. पण अजूनही बऱ्याच जणांना पॅनकार्ड आधारला लिंक केलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, अजूनपर्यंत 13 कोटी पॅनकार्डधारकांनी आधारकार्ड लिंक केलेले नाही. सरकारने पुन्हा एकदा आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक करण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढवली आहे.

30 जून अंतिम मुदत

इन्कम टॅक्स विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, 30 जूनपर्यंत आधारकार्ड-पॅनकार्ड लिंक करता येणार आहे. अन्यथा अशा पॅनकार्डधारकांना टॅक्सशी संबंधित कामे करता येणार नाहीत. एवढेच नाही तर अशा लोकांचे बँक खाते ओपन करून देणार नाही. त्यांना होमलोन किंवा इतर कोणतेच लोन घेता येणार नाही. आतापर्यंत 61 कोटी पॅनकार्ड धारकांपैकी जवळपास 48 कोटी पॅनकार्डधारकांनी ते आधारशी लिंक केले आहे. तरी अजून 13 कोटी लोकांनी पॅनकार्ड-आधारकार्ड लिंक केलेले नाही. या लोकांचे पॅनकार्ड 30 जूननंतर रद्दी होणार आहे. म्हणजे ते निष्क्रिय केले जाणार आहे.

पॅनकार्डशी संबंधित सर्व सेवा होणार बंद

इन्कम टॅक्स कायद्यातील सेक्शन 139A अंतर्गत इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी पॅनकार्ड-आधारकार्ड लिंक असणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्ही रिटर्न भरू शकणार नाही. ITR भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै ही देखील जवळ आली आहे. तसेच तुमचा कापलेला टॅक्स पुन्हा मिळवण्यासाठी तुम्ही क्लेम करू शकणार नाही. केंद्र सरकारने नव्याने केलेल्या मनी लॉण्ड्रिंग कायद्यांतर्गत पॅनकार्ड-आधारकार्ड लिंक करणे बंधनकारक आहे.

आधार कार्ड - पॅनकार्डला असे लिंक करा

  1. इन्कम टॅक्स वेबसाईटवरील होम पेजवर क्विक लिंक्स (Quick Links) मधून लिंक आधार (Link Aadhar)वर क्लिक करा.
  2. Link Aadhar वर क्लिक केल्यावर नवीन विंडो ओपन होईल. 
  3. इथे तुम्हाला सर्वप्रथम पॅनकार्ड क्रमांक, आधारकार्ड क्रमांक आणि आधारकार्डवर जसे नाव आहे तसेच इथे टाकायचे आहे.
  4. ही बेसिक माहिती भरल्यानंतर तुमचा अधिकृत मोबाईल क्रमांक टाका.
  5. त्यानंतर तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तरे टीकमार्क करून द्यायची आहेत. पहिला प्रश्न आधार कार्डवर फक्त जन्म तारखेचे वर्ष आहे. 
  6. दुसरा प्रश्न या प्रक्रियेसाठी आधार कार्डवरील माहिती तपासण्यासाठी मी तुम्हाला संमती देत आहे. 
  7. त्यानंतर लिंक आधार या बटनावर क्लिक केले की, तुमची प्रक्रिया पूर्ण होते.