Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ITR Filing Deadline: नोकरदारांनो लक्ष द्या, 'या' तारखेपर्यंत नक्की करा ITR फाईल करा

ITR File Before Last Date

Image Source : www.godigit.com

ITR Filing Deadline: तुम्ही नोकरी करत असाल किंवा तुमचा व्यवसाय करत असाल, तर तुम्हाला आयकर रिटर्न भरणे आवश्यक आहे. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपये आहे, त्यांनी आयटीआर फाइल करणे आवश्यक आहे. आर्थिक वर्ष 2022-23 करीता ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष बोर्डाने (CENTRAL BOARD OF DIRECT TAXES)10 फेब्रुवारी आणि 14 फेब्रुवारी 2023 रोजी अधिसूचनांद्वारे आर्थिक वर्ष 2022-23 करीता ITR दाखल करण्याची घोषणा केली आहे. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपये आहे. त्यांनी आयटीआर फाइल करणे आवश्यक आहे. आर्थिक वर्ष 2022-23 करीता ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. आयटीआर फॉर्म ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

अंतिम तारीख 31 जुलै 2023

आर्थिक वर्ष 2022-23 करीता ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. जर तुम्ही  शेवटच्या तारखेपर्यंत ITR भरला नाही, तर विभागाकडून तुम्हाला मोठा दंड ठोठावला जाऊ शकतो. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस ने 10 फेब्रुवारी आणि 14 फेब्रुवारी 2023 रोजी अधिसूचनांद्वारे आर्थिक वर्ष 2022-23 (AY 2023-24) साठी ITR दाखल करण्याची घोषणा केली आहे. यानंतर, 25 एप्रिल 2023 रोजी CBDT द्वारे ITR-1 आणि ITR-4 साठी अधिसूचना जारी करण्यात आली. 11 मे 2023 रोजी ITR-2 साठी अधिसूचना जारी करण्यात आली होती. यासोबतच आयटीआरचे ई-फायलिंगही सुरू झाले आहे.

डेडलाईन चुकल्यास भरावा लागेल दंड

आयकर विभागानुसार, असे पगारदार नागरिक आणि करदाते ज्यांच्या खात्यांचे ऑडिट करण्याची गरज नाही, ते ३१ जुलै २०२३ पर्यंत आयटीआर दाखल करू शकतात. परंतु कोणत्याही कारणास्तव तुम्ही ३१ जुलैच्या शेवटच्या तारखेपर्यंत आयटीआर दाखल करू शकला नाही, तर तुम्हाला १,००० ते ५,००० रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. ITR मध्ये विलंब झाल्यास,तुम्हाला फाईल करण्यापूर्वी दंडाची रक्कम भरावी लागेल. एवढेच नाही, तर तुमची अंतिम करपात्र रक्कम (Final Taxable Amount) शून्य असली, तरी तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. याशिवाय आयकर विभागाकडून तुम्हाला नोटीसही जारी केली जाऊ शकते. नवीन कर प्रणालीचा पर्याय निवडण्यासाठी, तुम्हाला तुमचा ITR 31 जुलै 2023 रोजी किंवा त्यापूर्वी दाखल करावा लागेल. यानंतर,आयटीआर फाइल करणाऱ्यांना नवीन कर प्रणाली निवडण्याची संधी मिळणार नाही.

फॉर्म -16 महत्वाचा

ITR भरण्यासाठी फॉर्म -16 हे सर्वात महत्वाचे कागदपत्र आहे. हा Form-16 सर्व पगारदार वर्गासाठी आवश्यक आहे. कारण या फॉर्ममध्ये कर्मचाऱ्याच्या वार्षिक आर्थिक व्यवहाराशी संबंधित संपूर्ण माहिती सविस्तरपणे दिली जाते. जसे की, तुम्हाला किती वार्षिक उत्पन्न मिळाले, किती कर कापला गेला, कोणत्या ठिकाणी तुम्ही कर वाचविला, ही सर्व माहिती फॉर्म -16 मार्फत दिली जाते. उत्पन्न, कर बचत, कर कपात आणि आपण गुंतवणूक केलेल्या स्त्रोतांवरील कर वजावट यासंबंधीचे सर्व तपशिल यात असतात.