Artificial Intelligence Wedding Couple Photos: आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे (Artificial Intelligence) तयार केलेली काही छायाचित्रे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्या आहेत. या पोस्टच्या माध्यमातून भारतातील विविध राज्यांतील विवाहित जोडपे कशी 'रूढीवादी' (Stereotypical) दिसतील, हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याबाबत लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्यात.
कोणी केले सोशलमिडीयावर पोस्ट?
भारतातील विविध राज्यातील विवाह सोहळे हे संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. काही ठिकाणी तर भारतीय परंपरेने लग्न करणे हा ट्रेंड मध्यंतरी सुरू होता. हे सांगण्याचे कारण म्हणजे भारतातील विविध राज्यातील लग्न संस्कृती ही चर्चा नव्याने सुरू झाली आहे. कारण काही दिवसांपूर्वी ‘@baghardh’ या ट्विटर युजरने आर्टिफिशियल इंटेलिजन्सने तयार केलेले काही पेंटिग्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्या आहेत. यामध्ये नवरा व नवरीची वेशभूषा जितकी आकर्षक आहे, तितकाच महत्वाचा हेतू हे फोटोज् सोशलमिडीयावर शेयर करणे आहे. खरंतर या युजरने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये वेगवेगळ्या संस्कृती पाहायला मिळत आहे.
काही पोस्टविषयी.....
या पोस्टमध्ये पंजाबी लग्नाचा तडका आहे, तर गुजरात व हिमाचलच्या लग्नाचे फोटोदेखील मस्त आहे. नागालँडपासून राजस्थानपर्यंतच्या लग्नांची संस्कृती या पेंटिग्सव्दारे दाखविण्यात आली आहे. हे फोटोज् लोकांच्या पसंतीस उतरत आहे. मात्र बंगालच्या चित्राबाबत वाद सुरू झाला आहे. जिथे AI व्दारे कल्पना केलेल्या जोडप्यांचे पेटिंग्सनी लोकांना आश्चर्यचकित केले आहे, तिथे त्यांनी काही प्रश्नदेखील उपस्थित केले आहेत. बंगाली लोकांना ते फोटोज् पाहून, सर्वाधिक आश्चर्यकारक वाटले, ते म्हणजे लग्नाच्या सुंदर पोशाखात एक मोठा मासा धरलेल्या जोडप्याचे फोटोज्.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
31 डिसेंबर 2022 रोजी हे पेटिंग्ज शेअर केल्यापासून या पोस्टला जवळपास 5.9 लाख वेळा पाहिले गेले आहे. तसेच, अनेकांनी फोटो रिट्विट करून त्यांच्या प्रतिक्रियादेखील शेअर केल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे, इतर प्रत्येक संस्कृतीचे फोटे हे सामान्य पद्धतीने तयार करण्यात आले आहे, मात्र बंगाली जोडप्यांचा फोटो हा त्या संस्कृतीविषयी माहिती घेऊन बनविण्यात आले आहे. तर दुसरा युजर्स लिहितो की, कोणीही बंगाली असे करत नाही... कृपया या कलेवर बंदी घाला. तिसऱ्या युजरने लिहिले, मला सांगा हा मोठा मासा मिळतो कुठे? मला माझ्या लग्नासाठी ऑर्डर करायचा आहे. अशा पध्दतीने सोशल मिडीयावर या पेटिंग्जची चर्चा सुरू आहे.