Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Paid Leave To Start Business: स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 'हा' देश देणार 1 वर्षाची पगारी सुट्टी

Paid Leave To Start Business

Paid Leave To Start Business: मध्यपूर्वेतील एक देश आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांना व्यवसाय सुरु करण्यासाठी एक वर्षाची पगारी रजा देत ​​आहे.

Paid Leave To Start Business: जर तुम्हाला कोणीतरी सांगितलं की, तुम्ही नोकरी करताना जर व्यवसाय करण्याचा विचार करत असला तर तुम्हाला पगारी १ वर्ष सुट्टी मिळू शकते तर यावर तुमचा विश्वास बसेल का? पण हे शक्य आहे आणि घडत देखील आहे. मध्यपूर्वेतील एक देश आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी चक्क १ वर्ष पगारी रजा(One Year Paid Leave) देत आहे. नक्की हा देश कोणता आहे, चला जाणून घेऊयात.  

कोणता आहे 'तो' देश?

'द खलीज(The Khaleej' Times)' टाईम्सच्या वृत्तानुसार, मध्यपूर्वेतील UAE या देशाने असे जाहीर केले आहे की 2 जानेवारी 2023 पासून, सरकारी क्षेत्रात काम करणार्‍या UAE नागरिकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि स्वयंरोजगार बनवण्याची इच्छा ठेवण्यासाठी वर्षभराची पगारी रजा/ सुट्टी लागू करण्यात येईल. दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम(Sheikh Mohammed bin Rashid Al Maktoum) यांनी जाहीर केले की, देशाच्या मंत्रिमंडळाने अधिक व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा नवीन उपक्रमास मान्यता दिली आहे. आपल्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेद्वारे ऑफर केलेल्या मोठ्या व्यावसायिक संधींचा लाभ घेण्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.

एक वर्षापर्यंत मिळेल निम्मा पगार!

नवीन नियमानुसार, जे स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक आहेत, त्यांना एक वर्षाच्या कालावधीसाठी पगारी रजा तर मिळेल पण त्यांचा पगार निम्म्या म्हणजेच अर्ध्या वेतन आधारावर दिला जाईल. रजा फेडरल प्राधिकरणाच्या प्रमुखाद्वारे मंजूर करण्यात येईल. ज्यामुळे कर्मचारी व्यावसायिक बनण्याचे स्वप्न साकार करू शकतो.

कंपन्यांसोबत भागीदारी करेल सरकार

UAE सरकारच्या एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, सरकार स्वयंरोजगारासाठी 'उद्योजकता रजा' प्राप्त करणार्‍या UAE नागरिकांच्या क्षमता निर्माण करण्यासाठी बिझनेस इनक्यूबेटर आणि खाजगी क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांसोबत भागीदारी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. उद्योजकता, कंपन्यांची स्थापना आणि व्यवस्थापन या क्षेत्रात कर्मचाऱ्यांना सहकार्य मिळणार आहे. रजा मिळविण्यासाठी कर्मचाऱ्याला अटी आणि आवश्यकता तपासाव्या लागतील.