Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Other Options Instead Of Personal Loan: पैशांची चणचण जाणवत असताना पर्सनल लोन ऐवजी 'हे' पर्याय नक्की वापरून पाहा

Other Options Instead Of Personal Loan

Other Options Instead Of Personal Loan: आर्थिक अडचणीच्या वेळी वैयक्तिक कर्जापेक्षा दुसरे कोणते पर्याय वापरता येतात हे जाणून घेणे गरजेचे आहे.

Other Options Instead Of Personal Loan: प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काहीतरी उतरचढाव येत असतात. अशा प्रसंगी आर्थिक अडचण(Financial Problem) आली की पैशाची चणचण भासतेच. मग आपण मित्रमंडळी, नातेवाईक यांच्याकडे उसनवारी करतो. काहींना कोणाकडेही उसने पैसे मागायला आवडत नाहीत तेव्हा ती लोकं थेट वैयक्तिक कर्जाला(Personal Loan) हात घालतात. अर्थातच बँका (Bank) कागदपत्रे आणि इतर प्रक्रिया पूर्ण करण्यात वेळ दडवतात. त्यामुळे अनेकदा गरजेच्यावेळी हा पर्यायही काहीच कामी येत नाही. वैयक्तिक कर्जापेक्षा(Personal Loan) दुसरे कोणते पर्याय वापरता येऊ शकतात हे जाणून घेणे गरजेचे असते. त्यासाठी आजचा लेख संपूर्ण वाचा.

क्रेडिट कार्डवर मिळते प्री अप्रुड कर्ज(Pre approved loan is available on credit card)

तुमच्याकडे क्रेडिट कार्ड(Credit Card) असेल तर त्यावर तुम्हाला प्री अप्रुड(Pre Approved) कर्जाची सुविधा देण्यात आली आहे. अथवा क्रेडिट कार्डवरील ऑफर(Credit Card Offer) नुसार आगाऊ रक्कम तुमच्या खात्यात जमा होत असते. पण या कर्जावर व्याजदरही जास्त द्यावा लागतो. पण ऐनवेळी पैशाची अडचण सोडवण्यासाठी ही सुविधा एक चांगला पर्याय आहे.

ओव्हरड्राफ्टची सुविधा(Overdraft facility)

तुमच्या बँकेच्या खात्यातून तुम्ही ओव्हरड्राफ्टची सुविधा(Overdraft Facility) मिळवू शकता. ओव्हरड्राफ्ट हा देखील कर्जाचाच(Loan) एक प्रकार आहे. बँका करंट अकाऊंट(Current Account), सॅलरी अकाऊंट(Salary Account) आणि फिक्स डिपॉजिटवर(Fix Deposit) ओव्हरड्राफ्टची सुविधा देत असतात. तुम्ही खात्यातील बॅलन्सपेक्षा(Balance) अधिकची रक्कम या ओव्हरड्राफ्टच्या मदतीने मिळवू शकता. या योजनेमध्ये ठराविक कालावधीसाठी व्याज(Interest) द्यावे लागते.

Line of Credit अंतर्गत कर्ज(Loan under Line of Credit)

क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना प्री अप्रुव्हड क्रेडिट लिमिट(Pre Approved Credit Limit) देण्यात येत असते. तसेच Line of Credit अंतर्गत त्यांना कर्ज मिळते. क्रेडिट स्कोअरच्या आधारावर Line of Credit अंतर्गत कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. यामध्ये तुम्ही जेवढा खर्च कराल, तेवढ्याच रक्कमेवर तुम्हाला व्याज द्यावे लागते. थोडक्यात काय तर वैयक्तिक जेवढे कर्ज घेतले, तेवढ्याच रक्कमेवर तुम्हाला व्याज द्यावे लागते.

मुदत ठेवीवर कर्ज(Loan on fixed deposit)

तुम्हाला बचतीची सवय असेल तर गरजेच्या वेळी केलेली आर्थिक गुंतवणूक उपयोगी पडते. तुम्ही बँकेमध्ये मुदत ठेव(Fixed Deposit) केली असेल तर त्या एफडीवर(FD) बँक तुम्हाला कर्ज देते. तुम्हाला एफडीवर 90 ते 95 टक्क्यांपर्यंत कर्जची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. याशिवाय मुदत ठेवीवर कर्ज देताना प्रक्रिया शुल्कही आकारले जात नाही. एफडीवर मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा कर्ज रक्कमेवरील व्याज हे 1 ते 2 टक्के जास्त असते.

तुम्हाला माहित आहे का, पीपीएफ खात्यावरील(PPF Account) बचतीवरही कर्जाची सुविधा मिळत असते. पण त्यासाठी या खात्याला 1 वर्ष पूर्ण असण्याची अट घालण्यात आली आहे. पीपीएफ खात्यावर(PPF Account) कर्ज घेतल्यास, तुम्हाला मिळणाऱ्या व्याजापेक्षा(Interest) फक्त 1टक्का जास्त व्याज द्यावे लागते. पीपीएफ खात्यावर 7.10 टक्के व्याजदर मिळत असेल तर कर्जाच्या रक्कमेवर 8.10 टक्क्यांपर्यंत व्याज द्यावे लागते. हे कर्ज तुम्हाला 36 हप्त्यांमध्ये फेडणे गरजेचे असते.