Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Credit Card Limit : क्रेडिट मर्यादेपलीकडे क्रेडिट कार्ड वापरणे शक्य आहे का?

Credit Card Limit

Credit Card Limit Information : खिशात काहीच पैसे नसतांना तुम्ही शॉपिंग करू शकता ते फक्त क्रेडिट कार्डमुळे, पण तुम्हाला क्रेडिट लिमिट असते मग जर शॉपिंग क्रेडिट लिमीटच्यावर गेली तरी आपण पेमेंट करू शकतो का? किती करू शकतो? कोण करू शकतो? याबाबत जाणून घ्या.

सावकार, पैशावाला मित्र पूर्वी अडीअचडणीत हमखास मदतीला यायचा. आता हे काम क्रेडिट कार्डमुळे अत्यंत सोपे झाले आहे. तुमचं बिल फेडायला अख्खी बँक (Bank) तुम्ही दिमतीला लावता, हा कधी विचार केला काय! क्रेडिट कार्डमुळे (Credit Card)  बँकचं खिशात घेऊन फिरता की नाही तुम्ही. अर्थात तुम्हाला आगाऊ खर्चासाठी दिलेल्या क्रेडिट कार्डमुळे खरेदी, गरजा भागविता येतात. त्यासाठी सुरुवातीला तुमच्या खिशाला झळ बसत नाही. नंतर बँक काय करते? तर व्याजासहित (With Interest) ग्राहकाकडून (Customer) रक्कम वसूल करते. 

क्रेडिट लिमिट म्हणजे काय? What is Credit Limit?

जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड घेता तेव्हा तुम्हाला क्रेडिट  मर्यादा ठरवून दिलेली असते, ती तुमच्या क्रेडिट स्कोअर, लोन परत करण्यासाठी घेतलेला कालावधी, तुमचे बँकेतील व्यवहार यावर अवलंबून असते. या गोष्टी तुमच्या व्यवस्थित असतील तर क्रेडिट लिमिटही व्यवस्थित मिळते. पण एखाद्या वेळेस तुम्हाला जर क्रेडिट लिमिट पेक्षा जास्त खर्च झाला तर तुम्ही तो करू शकता का? की तुमचं व्यवहार थांबतो? तुम्ही क्रेडिट लिमिटपेक्षा जास्त व्यवहार करू शकता त्याला ‘ओव्हर लिमिट’ असे म्हणतात.

ओवर लिमिट म्हणजे काय? आणि त्याचे व्याजदर 

तुम्हाला दिलेल्या लिमिट पेक्षा जास्त रक्कम तुम्ही वापरली की ओवर लिमिट होते जर तुमची क्रेडिट लिमिट 60000 असेल आणि खरेदी केल्यावर तुम्ही रुपये 65000 साठी कार्ड स्वाईप केले तर तुम्हाला बँकेकडून ओवर लिमिट  हे ऑप्शन दिले जाते. ओवर लिमिट हे ऑप्शन वापरण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त व्याज आकारले जाते हे व्याज तुम्ही घेतलेल्या अतिरिक्त रकमेच्या 2.5% ते 5% दरम्यान असते. हा व्यवहार अर्थात सहजासहजी पूर्ण होत नाही. तर ओव्हर लिमिटची सुविधा मिळविण्यासाठी बँक तुम्हाला विचारणा करते. तुमचा होकार मिळाला की ओव्हर लिमिट सुविधा मिळते. तुम्ही जर ओवर लिमिट ऑप्शनचा  वापर केला नाही तर तुमचा  व्यवहार स्थगित केला जाऊ शकतो.  ओवर लिमिटचे ऑप्शन वापरुन घेतलेली रक्कम बिनव्याजी नसते. उदाहरणार्थ, तुमची क्रेडिट लिमिट 70000 आहे आणि तुम्ही 72000चा व्यवहार केला तर 2000 वर व्याज आकारले जाते त्या व्याजला ‘लिमिट इंटरेस्ट’ म्हणतात. 

कोण आणि किती क्रेडिट लिमिट वापरू शकतात? 

ज्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर आणि बँक सीबील चांगला आहे, क्रेडिट कार्ड चे बिल वेळोवेळी पे करतो अशा व्यक्तीला क्रेडिट लिमिटचा वापर करता येतो. काही बँका तुम्हाला क्रेडिट मर्यादेपेक्षा 20 टक्क्यांपर्यंत खरेदी करण्याची परवानगी देतात तर काही बँका त्यापेक्षा जास्त रकमेची खरेदी करण्याची परवानगी देतात. प्रत्येक बँक वेगवेगळ्या ऑफर्स देतात. 


उधळ्या स्वभावाचा तोटा काय?

प्रत्येक वेळेला तुम्ही ओव्हर लिमिटचा वापर करणे मात्र योग्य नाही. वर्षातून कधीतरी अत्यंत निकडीच्यावेळी ही सुविधा वापरण्यास हरकत नाही. सातत्याने तुम्ही ओव्हर लिमिटचा वापर करत असाल तर त्याचा थेट परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर (Credit Score) हमखास पडतो.म्हणजे तुम्ही उधळ्या स्वाभावाचे आहात, यावर शिक्कामोर्तब होते. त्यामुळे इतर कर्ज मिळविताना तुम्हाला बँकेच्या चकरा हमखास माराव्या लागतात. एवढंच नाही तर ओव्हर लिमिटमुळे तुम्हाला सातत्याने वाढीव कर्जाचा भूर्दंड सहन करावा लागतो. The Credit Card Act 2009 अंतर्गत तुमच्यावर संपूर्ण क्रेडिट बिल चुकतं करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.  तुमचे आर्थिक नियोजन योग्य नसल्याचे बँकांना क्रेडिट स्कोअरवरुन दिसून येते.

एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा, तुम्हाला ओव्हर क्रेडिट लिमिट देण्याचा अधिकार बँकेचा असतो. बँक केवळ तुमच्याकडून ही गोष्ट वदवून घेते. एकदा तुम्ही ओव्हर क्रेडिट लिमिटचा वापर केला की, तुम्हाला व्याज आकरल्या जाते. पण तुम्ही ही रक्कम फेडण्यासाठी ईएमआयचा पर्याय निवडला तर बँक थेट क्रेडिट कार्ड ब्लॉक करते आणि तुमच्याकडून सर्व रक्कम सव्याज वसूल करते.