Oscar 2023 : राजमौली दिग्दर्शित आरआरआर (RRR) या चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात इतिहास रचला. बेस्ट ओरिजनल सॉंग श्रेणीत (सर्वोत्कृष्ट मूळ गाणे) नाटू नाटूला पुरस्कार मिळाला आहे. हा चित्रपट केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात लोकप्रिय ठरला. एसएस राजामौली दिग्दर्शित या चित्रपटाने भारतात 750 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तसेच भारताबाहेर 1 हजार 100 कोटींहून अधिक कमाई केली होती. या चित्रपटातील नाटू-नाटू हे गाणे संगीतकार एमएम कीरवानी यांनी संगीतबध्द केले आहे. तर अमेरिकेतील लॉस अॅंलेलिस येथील डॉल्बी थिएटर मध्ये 95 वा अकादमी पुरस्कार सोहळा रविवार, 12 मार्च रोजी पार पडला.
ऑस्कर पुरस्कारास RRR टीमचे हे सदस्य उपस्थित होते
या पुरस्कार सोहळ्याला दिग्दर्शक एस.एस राजामौलीसह त्यांची पत्नी रमा, मुलगा एस.एस कार्तिकेय हे सदस्य होते. अभिनेता राम चरण पत्नी उपासना कामिनेनी सोबत उपस्थित होते. ज्युनियर एनटीआर हे कुटुंबाशिवाय कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यानंतर संगीतकार एम एम किरावनी त्यांच्या पत्नी, गीतकार चंद्रबोस, गायक कालभैरव आणि हालू सिपलीगंज असे RRR टीम मधील एकूण 11 जण पुरस्कार सोहळ्यास अमेरिकेतील लॉस अॅंजेंलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये उपस्थित होते.
कुणाला मिळाले ऑस्कर पुरस्काराचे विनामूल्य प्रवेश तिकीट
ऑस्कर 2023 च्या एका तिकीटाची किंमत 25 हजार डॉलर्स (भारतीय चलनात सुमारे 20.6 लाख रुपये) इतकी असल्याचा दावा द इकॉनॉमिक टाइम्स या वृत्तसंस्थेने केला आहे. प्राप्त माहिती अशी आहे की, 'ऑस्कर 2023' मध्ये चंद्रबोस, एम.एम किरवानी आणि त्यांच्या पत्नींसाठी फक्त फ्रि पास देण्यात आला होता. इतर कुणालाही ऑस्कर पुरस्काराचे विनामूल्य प्रवेश तिकीट मिळाले नव्हते. याचा अर्थ 'नाटू नाटू' चित्रपटातील इतर आठ सदस्य तिकिट खरेदी करुन सोहळ्याला उपस्थित राहिले. दिग्दर्शक एस.एस राजामौली यांनी ऑस्कर पुरस्कार सोहळ्याकरीता इतर सर्व सदस्यांच्या तिकिटांसाठी जवळपास 1 कोटी 64 लाख रुपये एवढा खर्च केला. मंत्रमुग्ध करणारा हा 'ऑस्कर 2023' चा सोहळा दिग्दर्शक एसएस राजामौलींना आपल्या टिमसह अनुभवायाचा होत, त्यामुळे त्यांनी हा खर्च केला असे म्हणटले जाते.
‘ऑस्कर 2023’ च्या आयोजकांवर झाली टीका
'ऑस्कर 2023' कार्यक्रमात 'RRR' दिग्दर्शक एस.एस राजामौली आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सर्वात शेवटच्या रांगेत बसायला जागा दिल्याबद्दल चाहते व्यवस्थापनावर प्रचंड संतापले. अशा प्रकारे सर्वात शेवटी बसयला देणे म्हणजे ‘RRR’ टीमचा अपमान असल्याच्या भावना अनेकांनी सोशल मिडियावर व्यक्त केल्या होत्या. 'अकादमी अॅवार्ड्स'मध्ये भारतीय सिनेमाच्या एका गाण्याला पुरस्कार मिळाल्याने देशभरात आनंदाचे वातावरण आहे.