Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Oppo A17 स्मार्टफोन भारतात लॉन्च; किंमत फक्त 12,499 रुपये

Oppo A 17 launched in india

Image Source : www.oppo.com

ओप्पो कंपनीचा Oppo A17 हे मॉडेल भारतात लॉन्च झाले असून या स्मार्टफोनची किंमत 12,499 रुपये आहे. यामध्ये 50MP चा कॅमेरा असून काही ठराविक कार्डवर हा मोबाईल खरेदी केल्यास त्यावर 1500 रुपयांचा डिस्काऊंट मिळू शकतो.

Oppo A17 Smartphone Launched in India : ओप्पो कंपनीने नुकताच भारतात बजेट रेंजमधील स्मार्टफोन Oppo A17 लॉन्च केला. ओप्पोने लॉन्च केलेल्या A सिरिजमधील हा स्मार्टफोन मिडनाईट ब्लॅक (Midnight Black) आणि सनलाईट ऑरेंज (Sunlight Orange) या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. फोनची बॅटरी 5000mAh पॉवरची असून या स्मार्टफोनच्या खरेदीवर 1500 रुपयांपर्यंता डिस्काऊंट उपलब्ध आहे. Oppo A17 या स्मार्टफोनची किंमत 12,499 रुपये आहे.


कुठे आणि कसा मिळेल डिस्काऊंट!

Oppo चा हा लेटेस्ट स्मार्टफोन Oppo स्टोअर आणि इतर रिटेल मोबाईल स्टोर्असमधून विकत मिळू शकतो. कंपनीने Oppo A17 स्मार्टफोन लॉन्च करताना ग्राहकांना 1500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काऊंट देण्याचा निर्णय घेतला. हा डिस्काऊंट फक्त काही ठराविक कार्डच्या पेमेंटसवर दिला जाणार आहे. ज्यात अॅक्सिस बॅंक, कोटक बॅंक, एचडीएफसी बॅंक आणि आयसीआयसीआय बॅंकेच्या कार्डचा वापर करून हा डिस्काऊंट मिळवू शकता.

Oppo A17 चे फीचर्स!

OPPO FEATURES
ओप्पो A17 या स्मार्टफोनची डिस्प्ले साईज 6.56 इंच आहे. यात HD+ LCD डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60Hz आहे आणि याचा बॉडी टू स्क्रीन रेशो 89.8 टक्के आहे. डिस्प्लेची पिक्सल डेनसिटी 269 प्रति इंच आहे. डिस्प्लेच्या डिझाईनमध्ये वॉटर ड्रॉप स्टाईल नॉच टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. याचा फ्रंट कॅमेऱ्याचा लुक खूपच अट्रॅक्टीव्ह आहे. ग्राहकांना चांगल्या दर्जाचा अनुभव मिळावा यासाठी कंपनीने Oppo A17 स्मार्टफोनमध्ये Media Tek Helio G35 चिपसेटचा प्रोसेसर दिला आहे. तसेच यामध्ये 4GB RAM आणि 64GB स्टोअरेज आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने या फोनची कपॅसिटी 1TB पर्यंत वाढवता येणार आहे.

फोटोग्राफीचा मनमुराद आनंद लुटा!

फोटोग्राफीच्या अॅंगलने पाहिलं तर या स्मार्टफोनमध्ये AI सपोर्टसह ड्युअल कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 50MP आणि 2 MP डेप्थ सेंसर दिला आहे. व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी Oppo A17 मध्ये 5MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.

तसेच हा फोन Android 12 वर आधारित Color OS 12.11 या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Wi-Fi 5, GPS आणि A-GPS, Bluetooth v5.3, हेडफोन जॅक 3.5 mm आणि USB-C दिला आहे. याशिवाय या मोबाईलमध्ये सिक्युरिटीसाठी फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉक फीचर्स सुद्धा देण्यात आले आहे.