• 28 Nov, 2022 16:38

एका वर्षात मिळणार फक्त 15 Gas Cylinder!

एका वर्षात मिळणार फक्त 15 Gas Cylinder!

Gas Cylinder : नवीन नियमांनुसार घरगुती गॅस सिलेंडर ग्राहकांना वर्षभरात आता 15 सिलेंडर वापरता येणार आहेत. तसेच नोंदणीकृत ग्राहकांना फक्त 12 सिलेंडरवर अनुदान मिळणार आहे.

ऐन सणासुदीच्या काळात एलपीजी ग्राहकांना गॅस (LPG Gas) सिलेंडरच्या बाटल्यासाठी रेशनिंग प्रक्रियेला सामोरं जावं लागणार आहे. ग्राहकांसाठी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची (LPG Gas Cylinder) संख्या मर्यादित केली जाणार आहे. आता वर्षातून ग्राहकांना फक्त 15 एलपीजी गॅस सिलेंडर मिळणार आहेत. त्याचबरोबर गॅस सिलेंडर विकत घेण्याचा कोटाही निश्चित केला जाणार आहे; एका महिन्यात ग्राहकांना दोनपेक्षा जास्त गॅस सिलेंडर बाटले दिले जाणार नाहीत.

नवीन नियमानुसार विनाअनुदानित कनेक्शन (Non-Subsidy Connection) असलेल्या ग्राहकांनाही एका वर्षात फक्त 15 सिलेंडर बाटले (Gas Cylinder) विकत घेता येणार आहेत. पूर्वी नॉन-सब्सिडी कनेक्शन असलेल्या ग्राहकांना एका वर्षात कधीही आणि कितीही वेळा अधिकचे पैसे खर्च करून सिलेंडरचा बाटला मिळत होता. पण आता एका वर्षात फक्त 15 सिलेंडर ग्राहकांना मिळणार आहेत.

गॅस सिलेंडर बाटल्याची सेवा देणाऱ्या कंपन्यांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हा नवीन नियम तिनही तेल कंपन्यांना लागू करण्यात आला आहे. नवीन नियमानुसार, अनुदानित सिलेंडर ग्राहकांना वर्षभरात फक्त 12 गॅस सिलेंडर बाटले मिळणार आहेत. जर या ग्राहकांना यापेक्षा अधिक गॅस सिलेंडरचे बाटले हवे असल्यास त्यांना त्यावर अनुदान मिळणार नाही. ते त्यांना विनाअनुदानित किमतीसह विकत घ्यावे लागणार आहेत.

जास्तीच्या बाटल्यासाठी अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक

नवीन नियमानुसार एक ग्राहक एका महिन्यात फक्त दोन एलपीजी सिलेंडर घेऊ शकतो. ग्राहकांना वर्षभरात 15 पेक्षा जास्त सिलिंडर घेता येणार नाहीत. एखाद्या ग्राहकाला जास्त गॅस सिलेंडर अधिक लागत असल्यास त्याने संबंधित गॅस सिलेंडरचा पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे.

गॅस सिलेंडरच्या किमतीत 26 टक्क्यांनी वाढ!

घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत जुलै 2021 ते जुलै 2022 या 12 महिन्यांत 26 टक्क्यांनी वाढ झाली. जुलै 2021 मध्ये एका सिलेंडर बाटल्याची किंमत 834 रुपये होती. ती जुलै 2022 मध्ये 26 टक्क्यांनी वाढून 1,053 रुपयांवर पोहोचली.