आपण बरेच जण सध्या ऑनलाईन शॉपिंग करण्याला प्राधान्य देतो. यामागील कारण म्हणजे उत्तम दर्जाच्या वस्तू, रास्त किंमत आणि घरबसल्या खरेदी. आजच्या घडीला बाजारात अनेक ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट कंपन्या सक्रिय आहेत. मात्र या सर्वांना तोडीसतोड देण्याचे काम सरकारी शॉपिंग कॉमर्स वेबसाईट करत आहे. या वेबसाईटचे नाव 'ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स'(ONDC) असे आहे. सरकारकडून चालवण्यात येणारी ही डिजिटल कॉमर्स वेबसाईट अनेक खासगी कंपन्यांना स्पर्धा देत आहे. ONDC ने नुकतेच जारी केलेल्या आकडेवारीनुसार पोर्टलवर 9 जुलै 2023 रोजी एकाच दिवसात 35 हजार ऑर्डर्स देण्यात आल्या आहेत. यातील सर्वाधिक ऑर्डर दिल्ली एनसीआयमधून (Delhi NCR) देण्यात आल्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर बंगळूर शहराचा नंबर लागतो. त्यानंतर मुंबई, हैद्राबाद आणि पुणे शहराच्या क्रमांक लागतो. या पोर्टवरील कमिशन कमी असल्याने येथील उत्पादनाची किंमत कमी आहे.
कुठून किती ऑर्डर्स मिळाल्या?
ONDC ने दिलेल्या आकडेवारीनुसार 9 जुलै 2023 रोजी दिल्ली एनसीआरमधून 11,000 ऑर्डर्स देण्यात आल्या आहेत. त्यानंतर बंगळूर शहरातून 7,000 ऑर्डर्स दिल्या आहेत. यानंतर मुंबई, हैद्राबाद आणि पुणे शहराच्या क्रमांक लागतो. या शहरांमधून जवळपास 2 ते 3 हजार ऑर्डर्स देण्यात आल्या आहेत. या पोर्टलवर जवळपास 2 ते 3 टक्के कमिशन असल्याने यावरील उत्पादने स्वस्त आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा याकडे कल वाढला आहे. या पोर्टलवरून लोकांनी खाद्य पदार्थ आणि किरणामाल सर्वाधिक ऑर्डर केला आहे. त्यासोबतच शेती संबंधित गोष्टी देखील खरेदी केल्या आहेत.
दैनंदिन ऑर्डर संख्या 10 हजाराच्या पार
ONDC चे सीईओ टी. कोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार या पोर्टलवर सध्या किरकोळ वस्तू आणि शेती संबंधित गोष्टींची विक्री केली जाते. हे पोर्टल लॉन्च केल्यापासूनच एका आठवड्यात दैनंदिन ऑर्डरची संख्या 10 हजारापार पोहचली आहे. या पोर्टलवर बँकिंग आणि गुंतवणुकीशी संबंधित गोष्टी देखील लवकरच उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
इनसेंटिव्हची सुविधा मिळणार
या पोर्टलवर सरकारने 1 जून 2023 पासून इनसेंटिव्हचा लाभ देखील द्यायला सुरुवात केली आहे. सरकारच्या या पोर्टलमुळे फ्लिपकार्ट, Amazon, मिशो, स्वीगी, झोमॅटो यांना तगडी स्पर्धा निर्माण झाली आहे. 5 हजारांच्या खरेदीवर ग्राहकांना इनसेंटिव्ह मिळणार आहे. यापूर्वी दररोज 3 ऑर्डर्सवर इनसेंटिव्ह देण्यात आला होता. हा रिवोर्ड फोन पे,पेटीएम आणि मॅजिकपिनद्वारे पेमेंट केल्यावर दिला जाणार आहे.
Source: hindi.news18.com