Viral News: ऑस्ट्रेलियातील एका महिला बॉसने(Lady Boss Viral News) आपल्या कर्मचाऱ्यांना(Employee) लाखो रुपयांचा बोनस देऊन आनंदाचा धक्काच दिला आहे. या महिला बॉसने ख्रिसमसच्या(Christmas) निमित्ताने तिच्या 10 कर्मचाऱ्यांना $1 लाख म्हणजेच भारतीय चलनातील 82 लाख रुपयां इतका बक्कळ बोनस(Bonus) जाहीर केला आहे. त्यांच्या या कामगिरीनंतर सोशल मीडियाच्या(Social Media) माध्यमातून जगभरात यावर चर्चा होत आहे. सर्वच नेटकरी या महिला बॉसचे कौतुक करत आहेत.
10 कर्मचाऱ्यांना दिला ख्रिसमस बोनस
ऑस्ट्रेलियाच्या रॉय हिल कंपनीच्या बॉस जीना राइनहार्टबद्दल सध्या जगभरात चर्चा सुरु आहे, त्यांनी आपल्या 10 कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून 82 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.
बोनसची घोषणा ऐकून कर्मचाऱ्यांना आनंदाचा सुखद धक्का!
न्यूज कॉर्प ऑस्ट्रेलियाच्या म्हणण्यानुसार, राइनहार्टने गेल्या आठवड्यात सर्व रॉय हिल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना महत्त्वाच्या घोषणेसाठी तयार राहण्यास सांगितले होते. त्यांनतर त्यांनी बैठक आयोजित करून 10 कर्मचाऱ्यांची नावे जाहीर केली. ज्यांना 'ख्रिसमस बोनस' म्हणून 1 लाख डॉलर्स दिले जाणार आहेत. हे ऐकून कर्मचाऱ्यांना आनंदाचा सुखद धक्काच बसला आहे.अहवालानुसार, बोनस मिळविणाऱ्या एका कर्मचाऱ्याने नुकतेच तीन महिन्यांपूर्वी कंपनी जॉईन केली आहे.
राइनहार्ट नक्की कोण आहेत?
जीना राइनहार्ट या लोह-खनिज शोधक लँग हॅनकॉकची मुलगी आहेत. राइनहार्टने आपल्या दिवंगत वडिलांची आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेली खाण आणि कृषी कंपनी हॅनकॉक प्रॉस्पेक्टिंगची(Hancock Prospecting) पुनर्बांधणी केली आणि 1992 साली त्या कंपनीच्या कार्याध्यक्ष(chairman) झाल्या. रॉय हिल मॅनिंग प्रकल्प हॅनकॉकच्या सर्वात मौल्यवान मालमत्तेमध्ये गणले जाते. A$34 अब्ज एवढ्या संपत्तीसह, खाण उद्योगपती राइनहार्ट ऑस्ट्रेलियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये(Australia's richest women) गणल्या जातात. त्यांच्या कंपनीने गेल्या 12 महिन्यांमध्ये 190 अब्ज रुपयांहून अधिक नफा कमावला आहे.