Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ola Discount Offers: 31 डिसेंबरपर्यंत Ola च्या गाड्यांवर भरघोस सूट, जाणून घेण्यासाठी वाचत राहा

Ola Discount Offers

Image Source : www.olaelectric.com

Ola Discount Offers: 31 डिसेंबरपर्यंत ग्राहकांसाठी S1 Pro वर 10,000 रूपयांची सूट आणि S1 वर 4,000 रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक दिला जात आहे.

Ola Discount Offers: आज देशात आघाडीची इलेक्ट्रिक दुचाकी निर्माता कंपनी(Electric Two wheeler Producer Company) म्हणून 'Ola' ला ओळखले जाते. ओलाच्या गाड्या आज देशात अनेक जण वापरत आहेत. 2022 हे वर्ष आता संपत आले असून डिसेंबर महिन्यात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ओला इलेक्ट्रिकने काही खास डिस्काउंट ऑफर जाहीर केल्या आहेत. या ऑफर अंतर्गत, ग्राहकांना S1 Pro वर 10,000 रूपयांची सूट आणि S1 वर 4,000 चा अतिरिक्त कॅशबॅक दिला जाणार आहे. या ऑफरचा लाभ ग्राहकांना  31 डिसेंबरपर्यंत घेता येणार आहे.

31 डिसेंबरपर्यंत घेता येईल ऑफरचा लाभ

एक्स-शोरूम किंमतनुसार S1 Pro ची किंमत 1,25,000 रुपये असून  S1 ची किंमत 97,999 रुपये आहे. मात्र, S1 Pro या इलेक्ट्रिक स्कूटरवर(Electric Scooter) तुम्हाला 10,000 रुपयांची डिस्काऊंट ऑफर(Discount Offer) मिळणार आहे. याशिवाय  S1 स्कूटरवर तुम्हाला 4000  रूपयांची कॅशबॅक ऑफरसुद्धा(Cashback offer) देण्यात येत आहे. ग्राहकांना या स्कूटर झिरो डाऊन पेमेंटवर(Zero Down Payment) EMI द्वारे देखील खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.  

कोणते फीचर्स मिळणार आहेत? 

  • ओला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये नॉर्मल, इको आणि स्पोर्ट्स सारखे राइडिंग मोड उपलब्ध करून देण्यात आले आहेत 
  • इको मोडवर 125 किमी, नॉर्मल मोडवर 100 किमी आणि स्पोर्ट्स मोडवर 90 किमीची रेंज देण्यात आली आहे

Move OS 3 लवकरच उपलब्ध होणार

  • इलेक्ट्रिक स्कूटरसाठी आता कंपनीकडून लवकरच Move OS 3 अपडेट जारी करण्यात येणार आहे
  • यामध्ये हिल होल्ड, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग लेव्हल, साउंडट्रॅक इत्यादी वैशिष्ट्ये दिली जातील

Ola S One Pro Powertrain

  • Ola S One Pro इलेक्ट्रिक स्कूटरला 8.5kW चा बॅटरी पॅक दिला आहे ज्यामुळे  181 किमीची रेंज मिळते
  • त्याचा टॉप स्पीड 116 किमी/तास असून ही स्कूटर केवळ 3 सेकंदात 40 किमी प्रतितास इतका वेग सहज गाठू शकते

या इलेक्ट्रिक स्कूटरचा प्रतिस्पर्धी कोण?

  • Ola चा प्रतिस्पर्धी म्हणून 'एस वन टीव्हीएस आयक्यूब'(TVS iCube) सध्या चर्चेत आहे 
  • यामध्ये  4.4kW इलेक्ट्रिक हब मोटर मिळते, जी 3kW पॉवर आणि 140Nm पीक टॉर्क निर्माण करते ज्यामुळे त्याचा टॉप स्पीड 78 किमी प्रति तास मिळतो