ऑनलाइन कॅब बुकिंग सेवा पुरवणारी ओला कंपनी बंगळुरू शहरात महत्त्वाकांक्षी EV ओला कबॅचा पायलट प्रोजक्ट राबवणार आहे. १ हजार इलेक्ट्रिक कॅब बंगळुरूच्या रस्त्यावर दिसणार आहेत. ओलाच्या अॅपवरून EV कॅब बुक करता येणार आहे. त्यासाठी अॅपमध्ये रेग्युलर कॅब आणि ऑटो वगळता वेगळी कॅटेगरीचा समावेश करण्यात आला आहे.
एक वर्षात दहा हजार इव्ही कॅब्स
ओला कंपनीने इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमध्ये पाऊल ठेवले आहे. चालू वर्षात दहा हजार इव्ही कॅब लाँच करण्याची योजना कंपनीने आखली आहे. हरियाणातील गुरुग्राम शहरामध्ये ब्लूस्मार्ट कंपनीने इव्ही कॅब राइटची सेवा सुरु केली आहे त्याप्रमाणेच ओलाची इव्ही कॅबची सेवा असणार आहे. ओला कंपनीची प्रतिस्पर्धी कंपनी उबरनेही दिल्लीमध्ये इव्ही कॅबचा पायटल प्रोजेक्ट सुरू केला आहे.
ओलाच्या इव्ही कॅब चालकांना भाडेतत्त्वावर देण्यात येणार असून त्याद्वारे चालकांना निश्चित दहमहा उत्पन्न मिळेल. त्याशिवाय इतर व्हेरियेबल पे सुद्धा चालकांना राईडनुसार मिळेल, अशी माहिती मिळत आहे. ही सुविधा प्रिमियम कॅटेगरीत सुरु करण्यात येणार असून कॅब डायव्हरला राइड कॅन्सल करता येणार नाही.
नागपूरमध्ये राबवला होता पायलट प्रोजेक्ट
याआधी ओला कंपनीने नागपूर शहरामध्ये २०१७ साली इव्ही कॅबचा पायलट प्रोजेक्ट राबवला होता. यासाठी ओलाने महिंद्रा कंपनीशी सहकार्य केले होते. मात्र, कालांतराने हा प्रकल्प बंद करण्यात आला होता. मागील काही दिवसांपासून इंधनाचे दर सतत वाढत असल्याने चालकांना मिळणारा इंसेंटिव्ह कमी होत आहे. त्यामुळे अनेक चालक ओला, उबरमधून बाहेर पडत आहेत. मात्र, आता यावर उपाय म्हणून कंपनी इव्ही कॅब सेवा पुरवण्याच्या तयारीत आहे.