Ola Electric Bikes: इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये चांगला प्रतिसाद मिळल्यानंतर ओला इलेक्ट्रिकने एक मोठी घोषणा केली आहे. जे ओला इलेक्ट्रिक मोटरसायकलची वाट पाहत होते त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की या Bangalore स्थित कंपनीने 5 नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकलचा टीझर रिलीज केला आहे.
ओला इलेक्ट्रिक आगामी काळात 5 वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक बाइक्स लॉन्च करेल, ज्या स्क्रॅम्बलर, नेकेड, क्रूझर, कॅफे रेसर आणि अॅडव्हेंचर टूरर (Scrambler, Naked, Cruiser, Cafe Racer and Adventure Tourer) सेगमेंटमध्ये असतील. ओला इलेक्ट्रिकने यापूर्वी दोन इलेक्ट्रिक मोटरसायकल लॉन्च करण्याची घोषणा केली होती, एक प्रीमियम सेगमेंटसाठी आणि एक बजेट इलेक्ट्रिक बाइकसाठी. आता कंपनीने 5 नवीन इलेक्ट्रिक बाइक्सबद्दल सांगितले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ओला इलेक्ट्रिक कंपनी आगामी काळात 1 लाख रुपयांपेक्षा स्वस्त इलेक्ट्रिक बाइक लॉन्च करू शकते. e-vehicleinfo च्या रिपोर्टनुसार, Ola इलेक्ट्रिक रेंजर नावाची एक परवडणारी इलेक्ट्रिक बाइक लॉन्च केली जाऊ शकते, ज्याची बॅटरी रेंज 80 किमी आणि टॉप स्पीड 90 किमी प्रति तास असू शकते. यानंतर, ओला इलेक्ट्रिक कंपनीच्या अधिक मोटारसायकली जास्त किंमतीच्या रेंजमध्ये असतील, ज्यांचा स्पीड आणि बॅटरी रेंज उत्तम असणार आहे.
ओला इलेक्ट्रिक स्कूटर किमती….. (Ola Electric Scooter Prices….)
ओला इलेक्ट्रिकने आता आपली लोकप्रिय स्कूटर Ola S1 Air 3 प्रकारांमध्ये विकण्याची घोषणा केली आहे, ज्यामध्ये Ola S1 Air 2 kWh बॅटरी पॅकची किंमत 84,999 रुपये आहे आणि त्याची बॅटरी रेंज 85 किलोमीटरपर्यंत आहे. तर, Ola S1 Air 3 kWh बॅटरी पॅकची किंमत 99,999 रुपये आहे आणि बॅटरी रेंज 125 किमी आहे. त्याच्या टॉप व्हेरिएंट Ola S1 Air 4 kWh बॅटरी पॅकची किंमत 1,09,999 रुपये आहे आणि एका चार्जवर 165 किमी पर्यंत बॅटरी रेंज आहे.